Jitendra Awhad | ‘शाईफेक करणार्‍यावर 307 चा गुन्हा योग्य नाही’ – जितेंद्र आव्हाड

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – शनिवारी (दि. 10) पिंपरी चिंचवड येथे एका कार्यक्रमातून निघत असताना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकात पाटील यांच्यावर एकाने शाई फेकली. त्यामुळे राज्यात वादाला सुरुवात झाली आहे. शाई फेकणाऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. हा इसम समता सैनिक दल या संघटनेशी संलग्न आहे. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न (भा. द. वि. 307) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावरुन विरोधी पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने गुन्हा दाखल करताना मोठे मन दाखवावे, शाई फेकीचा गुन्हा खुनाच्या प्रयत्नात येत नाही, असे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले आहेत.

चंद्रकांत पाटील यांच्या विधानानंतर त्यांच्यावर शाईफेक करणे चुकीचे होते. पण सरकार म्हणून मोठे मन असावे लागते. हा आंदोलनाचा एक भाग असतो. अनेकवेळा अशा घटना होत असतात. पण सरकार ज्यावेळी शाई फेकीच्या प्रकरणात 307 (खुनाचा प्रयत्न) गुन्हा दाखल करत असेल, तर ते आणखीणच चुकीचे आहे. न केलेल्या गुन्ह्यासाठी एखादे कलम लावणे म्हणजे, यातून आंदोलनाच्या समर्थकांना पूर्णपणे जागे करणे होय. माझ्यावर लावलेले कलम 354 आणि 307 हे दोन्ही चुकीचे आहेत, असे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले आहेत.

कोणावरही शाई फेकणे चुकीचे आहे. मी त्याचे समर्थन करत नाही.
पण चंद्रकांत पाटील यांनी शाळा आणि महाविद्यालयांना देण्यात येणाऱ्या निधीवरुन भीक मागा अशी सूचना केली,
ती अयोग्य आहे. शाईफेक करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला,
पण महाराष्ट्रातील महापुरूषांचा अपमान करणाऱ्या राज्यापालांवर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.
स्त्रियांबद्दल अपमानकारक वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या नेत्यांवर गुन्हा दाखल केला जात नाही,
असे अजित पवारांनी स्पष्ट केले. 307 कलमान्वये गुन्हा दाखल करणे चुकीचे आहे,
असे छगन भुजबळ यांनी देखील म्हटले आहे.

Web Title :- Jitendra Awhad | jitendra awhad shaifek was wrong but as a government you have to have a big heart jitendra awhad on chandrakant patil

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update