Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांची आजची रात्र पोलीस ठाण्यातच

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना शुक्रवारी (दि. 11) दुपारी ठाण्यातील वर्तक नगर पोलिसांनी (Vartak Nagar Police Station) अटक केली आहे. त्यांच्यावर ठाण्यातील एका मॉलमधील ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) चित्रपट बंद पाडल्याचा आणि प्रेक्षकांना मारहाण केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी देखील याविरोधात लढण्याचा निर्धार दाखविला आहे. त्यांनी मी न केलेल्या गुन्ह्याची माफी मागणार नाही, असे म्हटले आहे. तसेच त्यांनी जामीनासाठी देखील कोणताही अर्ज केलेला नाही. त्यामुळे त्यांना आजची रात्र पोलीस ठाण्यातच काढावी लागणार, असे चित्र आहे.

 

जितेंद्र आव्हाड यांना उद्या (शनिवार दि. 12) ठाणे न्यायालयात (Thane Court) हजर करण्यात येणार आहे. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना आज न्यायालयात हजर करण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यानंतर न्यायालयाच्या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता, पण आता हा बंदोबस्त कमी करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना उद्या न्यायालयात आणले जाण्याची शक्यता आहे.

‘हर हर महादेव’ या चित्रपटात इतिहासाची मोडतोड करुन चित्रपट तयार केल्याचा आरोप काही संघटना आणि इतिहास अभ्यासकांनी केला होता.
त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आवाज उठविला होता. ठाण्यातील एका मॉलमध्ये या चित्रपटाचा प्रयोग सुरु असताना,
जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत जाऊन चित्रपट बंद पाडला आणि प्रेक्षकांना मारहाण केली होती.
त्यांच्याविरोधात ठाण्यातील वर्तक नगर पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.
त्यानुसार आज (दि. 11) जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे.
त्यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि प्रांताध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी त्यांच्या भूमिकेला सहमती दर्शविली आहे.
तसेच राज्यातील राष्ट्रवादी त्यांच्या पाठिशी ठाम उभी आहे, असे देखील म्हंटले आहे.

 

Web Title :-  Jitendra Awhad | Jitendra Awhad’s night in the police station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Supriya Sule | जितेंद्र आव्हाड यांना झालेल्या अटकेचा मला अभिमान आहे – सुप्रिया सुळे

Pune Crime | नविन मिटर घेऊन देण्याच्या बहाण्याने फसवणूक, काही तासातच आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

Nanded Crime | नंदिग्राम एक्सप्रेससमोर उडी घेत प्रेमीयुगुलाची आत्महत्या, भोकर रेल्वे स्थानकाजवळील घटना