मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Jitendra Awhad | राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering Case) प्रकरणामुळे तुरूंगात आहेत. भाजपने (BJP) यावरून आक्रमक पवित्रा घेत नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत (Don Dawood Ibrahim) संबंध असल्याची शंका येते, असं म्हणत पवारांवर निशाणा साधला होता. मात्र अशातच राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पंतप्रधान मोदींचा जुना व्हिडीओ ट्विट करत भाजपच्या नेत्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), शरद पवार यांच्याबद्दल त्यांनी मुंबईला अंडरवर्ल्डपासून (Mumbai Underworld) वाचवल्याचं म्हटलं आहे. त्या व्हिडीओमध्ये, मुंबईत पाऊस (Rain) पडला तर दिल्लीत थंडी (Light) वाजते अशा प्रकारचं नातं मुंबई आणि दिल्लीचं (Dehli) आहे. मुंबई देशाचं आर्थिक केंद्र (Financial Capital) आहे, मात्र एक काळ असा आला होता की मुंबईला अंडरवर्ल्डने काबीज केलं होतं, एक अंधार परसला होता. पण शरद पवारांचं कौशल्य आणि हिंमत होती की त्यांनी मुंबईला त्यातून बाहेर काढलं, हे पवारांचं सामर्थ्य असल्याचं नरेंद्र मोदी बोलताना दिसत आहेत.
अंडरवर्ल्ड अन शरद पवारांबद्दल पंतप्रधान मोदीजी हे काय बोलत आहेत ?
ज्यांना समजेल त्यांनी वाचावे बाकीच्यांनी बक बक चालू ठेवावी pic.twitter.com/bOpBATgiTT— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 13, 2022
नवाब मलिकांचा राजीनामा घेत नाही म्हणून भाजप नेते पवारांवर टीका करत आहेत. मात्र जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी थेट पंतप्रधानांचा व्हिडीओ ट्विट केला आहे. त्याला, कॅप्शनमध्ये, अंडरवर्ल्ड अन शरद पवारांबद्दल पंतप्रधान मोदीजी हे काय बोलत आहेत?,
ज्यांना समजेल त्यांनी वाचावे बाकीच्यांनी बक बक चालू ठेवावी, असं म्हणत भाजपवर निशाणा साधला.
दरम्यान, भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) आणि निलेश राणे यांनी शरद पवारांबाबत केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे (NCP) समर्थक आक्रमक झाले आहेत.
Web Title : Jitendra Awhad | NCP Chief sharad pawar saves mumbai from underworld
pm narendra modis video goes viral Jitendra Awhad twitter post
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update