Jitendra Awhad | ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाच्या दृश्यावर जितेंद्र आव्हाडांचा आक्षेप; म्हणाले – “मराठी माणसाला येड्यात काढताहेत”

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिवाजी महाराजांचा चुकीची इतिहास दाखवला जात असल्याचे म्हणून महाराष्ट्रात दोन चित्रपटांवर मोठा वाद सुरू आहे. हर हर महादेव या चित्रपटाच्या दृश्यांवर आणि संवादांवर आक्षेप घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी तर ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये चित्रपटाचा प्रयोग बंद पडला होता. त्यामुळे त्यांना ठाणे पोलिसांनी अटक केली होती, आता ते न्यायालयाने दिलेल्या जामिनावर बाहेर आहेत. पण जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे.

 

शिवाजी महाराजांच्या इतिहासाचाच एक भाग असणाऱ्या प्रतापराव गुजर यांचे कथानक प्रेक्षकांसमोर आणणाऱ्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटावर वाद सुरू आहे. या चित्रपटात असलेल्या सात मराठयांच्या नावावरून आधीच वाद सुरू असताना चित्रपटातील एक स्क्रीनशॉट शेअर करत जितेंद्र आव्हाडांनी टीका केली आहे. जितेंद्र आव्हाडांनी चित्रीकरणादरम्यानच्या एका दृश्याचा फोटो ट्विटरवर टाकला आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अक्षय कुमार दिसत आहे. मात्र, त्याच्यामागे लावलेल्या झुंबराला बल्ब लावल्याचे दिसून येत आहेत. त्यावरून जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) खोचक टोला लगावला आहे. “बल्बचा शोध कधी लागला…काय थट्टा लावली आहे … मराठी माणसाला येड्यात काढता आहेत”, असे ते या ट्विटमध्ये लिहितात.

या चित्रपटावर आधीच अनेक आक्षेप घेतले आहेत.
यापैकी एक म्हणजे प्रतापराव गुजर यांच्यासमवेत नेमके किती सरकार लढाईसाठी गेले,
याबद्दलचा एक आक्षेप आहे. काहींच्या मते ७ तर काहींच्या मते ८ सरदार होते.
तसेच त्यांच्या नावाबद्दलही वाद निर्माण झाला आहे.
यावर काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत याबाबत त्यांची भूमिका मांडली होती.
प्रतापराव गुजर यांच्यासमवेत नेमके किती सरदार होते किंवा होते की नव्हते,
त्यांची नावं काय होती यासंदर्भात कोणताही ऐतिहासिक पुरावा समोर आलेला नाही, असे राज ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले.

 

Web Title :- Jitendra Awhad | ncp jitendra awhad mocks vedat marathe veer marathi movie akshay kumar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा