Jitendra Awhad | आता शिवसेना-राष्ट्रवादीच्या याचिकांवर एकत्र सुनावणी; जितेंद्र आव्हाड म्हणाले…

मुंबई : Jitendra Awhad | शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर (Shivsena MLA Disqualification Case) विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी सुरू आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) दोन्ही गट पक्षावर हक्क सांगत आहेत. दरम्यान, विधानसभा अध्यक्षांकडून वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप शरद पवार गटाने (Sharad Pawar Group) केला आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) राष्ट्रवादी काँग्रेसने याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी होणार होती, पण ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून ती आता १३ ऑक्टोबरला होईल. (Jitendra Awhad)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या याचिकेवर १३ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. त्याच दिवशी ठाकरे गटाच्या (Thackeray Group) याचिकेवरही सुनावणी होईल. दोन्ही गटांच्या याचिकांवर एकत्र सुनावणी होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. ही माहिती शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाकडून आमच्या अपेक्षा होत्या, त्या पूर्ण होताना दिसत आहेत. काहीसा न्याय मिळाल्याचे दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या याचिकेवर १३ तारखेला सुनावणी होईल. न्याय मिळेल असे मला वाटत आहे. आम्ही २ जुलैलाच अपात्रता याचिका दाखल केल्या आहेत. त्या कधी दाखल केल्या हे महत्त्वाचे नसून निर्णय कधी होईल हे महत्वाचे आहे.

सनातन कधीच धर्म नव्हता
यावेळी, जितेंद्र आव्हाड यांना त्यांनी सनातन धर्मावर केलेल्या टीकेसंदर्भात विचारले असता ते म्हणाले,
ज्या धर्माने देशात जातीवाद आणला, स्त्रियांना अधिकार मिळाला नाही तो धर्म नाही. सनातन हा धर्म नाही.
हिंदू धर्मातल्या कट्टरवाद्यांना सनातन म्हणतात. सनातन कधीच धर्म नव्हता. ६ महिन्यांपासून हा नवीन धर्म कुठून
शोधून आणला तेच कळत नाही.

सनातन्यांविरोधात आमचा लढा
आव्हाड म्हणाले, आम्ही २००३-०४ पासून सनातन्यांविरोधात लढा देत आहोत. मला मारण्याचा प्रयत्न झाला, ते सगळे सनातनीच होते. हिंदू धर्म वसुधैव कुटुंबकम मार्गावर चालणारा आहे. सगळ्यांना आपले मानणारा आहे.

… यांना सनातन्यांनी छळले
आव्हाड म्हणाले, धर्मात वसख हजार वर्षांपासून जो अन्याय आहे, तो सनातन्यांनी केला. संत तुकाराम, बुद्ध, महावीर जैन, बसवेश्वर अण्णा, ज्ञानेश्वर माऊली, सावता माळी, बाबासाहेब आंबेडकर यांना सनातन्यांनी छळले.

सनातन्यांचा आणि हिंदू धर्माचा संबंध नाही
आव्हाडांनी सनातन वृत्तीवर टीका करताना म्हटले, ज्ञानेश्वर माऊलींच्या आई-वडिलांनी सनातन्यामुळे आत्महत्या
केली होती. शिवाजी महाराजांना राज्याभिषेक सनातन्यांनी नाकारला होता.
महात्मा फुले-सावित्रीबाईंना दगड-गोटे, शेण सनातन्यांनी मारले. शाहू महाराजांची हत्या करण्याचा प्रयत्न सनातन्यांनी केली.
महात्मा गांधींची हत्या सनातन्यांनी केली. सनातन्यांचा आणि हिंदू धर्माचा तसा काही संबंधच नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी महिलेला पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर