Jitendra Awhad | ‘मी जनतेच्या मनातील भारताचा पंतप्रधान’, राज ठाकरेंच्या बॅनरवरुन जितेंद्र आव्हाडांचा टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांचा गुढीपाडवा मेळावा (MNS Padwa Melava) आज शिवाजी पार्क येथे होत आहे. मात्र या सभेआधी शिवसेना भवनासमोरील (Shiv Sena Bhavan) एका बॅनरने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ‘जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री राज ठाकरे’ असा उल्लेख या बॅनरवर केला आहे. या बॅनरवरुन अनेक नेत्यांकडून प्रतिक्रिया येत असताना राष्ट्रवादीचे (NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी देखील प्रतिक्रिया देताना टोला लगावला आहे. ‘मलाही वाटते मी जनतेच्या मनातील भारताचा पंतप्रधान (Prime Minister) आहे’ असा टोला जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी लगावला आहे.
मनसेने लावलेल्या या बॅनरवरुन भाष्य करताना जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले, जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत, असं जर त्यांना वाटत असेल तर चांगली गोष्ट आहे. मलाही वाटते मी जनतेच्या मनातील भारताचा पंतप्रधान आहे, असा टोला आव्हाडांनी लगावला आहे.
दरम्यान, आपल्याला जे काही बोलायचे आहे ते आपण 22 मार्च रोजी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्क
(Shivaji Park) वरुन बोलू, असं राज ठाकरे यांनी सांगितले होते.
त्यामुळे आजच्या होणाऱ्या सभेत राज ठाकरे कोणत्या दिशेने गुढी उभारणार? हा राज्यातील राजकीय नेते,
कार्यकर्ते यांना पडलेला प्रश्न आहे. मात्र या सभेआधी लावण्यात आलेल्या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी हा बॅनर सभास्थळी लावला आहे.
Web Title : Jitendra Awhad | ncp leader jitendra awad has taunt mns chief raj thackeray
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा