Jitendra Awhad | ‘औरंगजेब क्रूर आणि हिंदूद्वेष्टा असता तर…’ वादग्रस्त वक्तव्यावर सारवासारव करताना जितेंद्र आव्हाड पुन्हा चुकले, म्हणाले…

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्याबद्दल अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात वाद निर्माण झाला आहे. भाजप (BJP) नेत्यांनी अजित पवार यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. अजित पवारांची पाठराखण करण्यासाठी पुढे सरसावलेल्या आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी वादग्रस्त विधान केलंय. या वादग्रस्त विधानावर सारवासारव करताना जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आणखी एक पत्रकार परिषद घेतली, मात्र त्यावेळीही त्यांनी एक चूक केली आहे.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही पहिल्यापासूनच स्वराज्य रक्षक (Swaraj Rakshak) म्हणतो. ते संगमेश्वरला सरदेसाईंच्या वाड्यात होते. ही बातमी औरंगजेबाला (Aurangzeb) दिली कुणी? इथेच तर खरा इतिहास आहे. छत्रपती संभाजी महाराजांना बहादुरगडावर नेण्यात आले तिथे त्यांचे डोळे काढण्यात आले. त्या ठिकाणी विष्णूचे मंदिर आहे. औरंगजेब क्रूर आणि हिंदूद्वेष्टा असता तर त्याने विष्णूचं मंदिरही फोडलं असतं. तिथून छत्रपती संभाजीराजेंना तुळापूरला नेण्यात आले. त्यानंतर पुढे काय झाले तो इतिहास सगळ्यांनाच माहित आहे, असे आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले.

वक्तव्यावर सारवासारव अन्

वादग्रस्त विधानावर वाद होईल हे लक्षात येताच जितेंद्र आव्हाड यांनी सारवासारव करण्यासाठी त्यांनी आणखी
एक पत्रकार परिषद घेतली. पुन्हा प्रतिक्रिया देत औरंगजेब क्रूर होता अशी सारवासावर केली,
मात्र त्यातही त्यांनी चूक केली. औरंगजेबाचा मृत्यू औरंगाबादमध्ये झाल्याचे आव्हाड म्हणाले.
औरंगजेबाचा मृत्यू नगर जिल्ह्यातील भिंगारमध्ये झाला होता, पण औरंगजेबाच्या इच्छेनुसार औरंगाबादमध्ये
त्याचा दफनविधी करण्यात आला होता. दरम्यान, औरंगजेबाच्या मृत्यूबाबत आपण चुकीची माहिती दिल्याचं आव्हाड यांनी मान्य केलं.

वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण

औरंगजेब किती क्रूर होता हे इतिहासात लिहून ठेवलं आहे. त्याने भावाला, वडिलांना मारलं आणि गादीवर बसला.
औरंगजेब क्रूरच होता. स्वत:च्या राज्य रचनेकरता औरंगजेब कोणालाही सोडत नव्हता,
पण त्याला महाराष्ट्र कधीही जिंकता आला नाही, असं स्पष्टीकरण आव्हाड यांनी दिलं.

Web Title :-  Jitendra Awhad | ncp leader jitendra awhad controversial statement on aurangzeb watch video

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Kisan | शेतकऱ्यांच्या खात्यात याच आठवड्यात येऊ शकतो १३ वा हप्ता, असे तपासू शकता स्टेटस

Ruhanika Dhawan | ‘या’ बालकलाकाराने केवळ वयाच्या 15 व्या वर्षी केले स्वतःचे घर खरेदी; पोस्ट वायरल