Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ ट्वीटमुळे चांगलीच खळबळ; जाणून घ्या नक्की काय आहे ते ट्वीट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Jitendra Awhad | अजित पवारांच्या विधानभवनात केलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दलच्या वक्तव्याने राज्यातील सत्ताधारी भाजप आणि विविध शिवप्रेमी संघटना आक्रमक झाल्या आहेत. अजित पवारांनी या वक्तव्याबाबत जाहीर माफी मागावी अशी मागणी होत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलेल्या एका ट्वीटने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमधून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि माधव गोळवलकर यांच्यावर एक खळबळजनक दावा केला आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आणि माधव गोळवलकरांनी छत्रपती संभाजी महाराज हे स्त्रीलंपट आणि व्यसनाधीन होते, असं लिहून ठेवले आहे. असा खळबळजनक दावा जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) केला आहे. तसेच त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये इंग्रजी आणि मराठी भाषेतील पुस्तकांची पाने देखील शेअर केली आहेत. ज्यांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लिहले गेले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि माधव गोळवलकरांच्या पुस्तकातील ही पानं असल्याचं जितेंद्र आव्हाडांचे म्हणणे आहे. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांचे हे ट्वीट सोशल मिडीयावर वेगाने व्हायरल होत आहे.

जितेंद्र आव्हाड आपल्या ट्वीटमध्ये लिहितात, ‘सावरकरांनी आणि माधव
गोळवलकरांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काय लिहून ठेवले आहे? ते वाचा… या शूरवीरास बदनाम
करण्याचे काम एका वर्गाकडून अनेकवेळा झाले. सावरकर आणि गोळवलकरांच्या दृष्टीने संभाजीराजे हे ‘स्त्रीलंपट’ आणि ‘व्यसनाधीन’ होते. यावर कोणी बोलेल का?’ असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी विचारला आहे.

त्याचप्रमाणे, त्यांनी याबाबत पुढे लिहिले आहे की, ‘शंभूराजे हे स्वराज्यरक्षक आणि धर्मरक्षकही होते.
शिवाजी महाराजांनी रयतेसाठी जे स्वराज्य निर्माण केले, त्याचे रक्षण करण्याचे काम शंभूराजेंनी केलं.
त्यांना धर्म म्हणजे महाराष्ट्र सगळ्यांना सामावून घेणारा मराठा धर्म अभिप्रेत होता.
त्यामुळे स्वराज्य धर्म बाजूला कसे काढता येईल?’ असेही जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे.

Web Title :-  Jitendra Awhad | ncp mla jitendra awhad tweet on savarkar and madhav golwalkar write up on sambhaji maharaj woman and wine addicted

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Kisan | शेतकऱ्यांच्या खात्यात याच आठवड्यात येऊ शकतो १३ वा हप्ता, असे तपासू शकता स्टेटस

Ruhanika Dhawan | ‘या’ बालकलाकाराने केवळ वयाच्या 15 व्या वर्षी केले स्वतःचे घर खरेदी; पोस्ट वायरल