Jitendra Awhad | ‘फ्लॅट रेंटनं देताना तसेच विकताना सोसायटीच्या NOC ची गरज नाही’ – मंत्री जितेंद्र आव्हाड

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – Jitendra Awhad | घर मालक आणि खरेदीदार यांच्यात सौदा झाला तर परवानगीची (Society NOC) काहीच गरज नसल्याची माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दिली आहे. फ्लॅट रेंटनं देताना तसेच फ्लॅट विक्रीसाठी सोसायटीची परवानगी लागत होती, दरम्यान आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार आता याची आवश्यकता लागणार नाही. (If the owner wants to rent his flat or sell his flat he needs no NOC from the society – Dr. Jitendra Awhad)

 

माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले की, ”घर मालकाला स्वत:चा घराचा हक्क आहे की ते घर कोणाला विकावे, एखाद्या घरमालकाला घर विकायचा असेल तर त्याकरिता सोसायटीची परवानगी कशासाठी घर मालक आणि खरेदीदार यांच्यात सौदा झाला तर परवानगीची काहीच गरज नाही. काही ठिकाणी जातीनिहाय घरे विकली जातात गुजराती गुजराती यांना जैन जैन यांना तर शाकाहारी शाकाहारी यांनाच विकतात. यामुळे महाराष्ट्र हा वेगवेगळ्या विभागांत विभागला जात आहे मुंबई ही एकत्र राहिले पाहिजे यासाठी हा प्रयत्न आहे.”

पुढे आव्हाड म्हणाले, ”एखाद्या घरमालकाने त्याची थकबाकी बाकी नाही, हे एनओसी पत्र काढून घ्यावे सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस तपास करतात,” असं देखील ते म्हणाले, तसेच, ”मुंब्रा – कळवा (Mumbra – Kalwa) येथे मोठ्या प्रमाणात खार जमीन आहे या जमिनीच्या संरक्षणासाठी वारंवार MIDC ला पत्र दिले व याचा पाठपुरावा केला. या जमिनीला संरक्षित करण्यासाठीही अनेक वेळा संबंधित खात्याला सांगितले आहे. पण, कोणाला त्याचं गांभीर्य नाही या जमिनीचा विकास करण्याचा दूरच राहिला या जमिनीवर निवडणुकीची कार्यालय आणि तलाठी यांची कार्यालय बांधण्याची इच्छा काही लोकांना आहे,” असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

 

Web Title :- Jitendra Awhad | noc of society is not required for sale of flats big announcement of jitendra awhad

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा