काँग्रेसच्या ‘त्या’ उमेदवाराचे सनातन संस्थेशी संबंध असल्याचा आव्हाडांचा दावा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आपल्या विधानाने नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडलणारे जितेंद्र आव्हाड यांनी सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघाच्या काँग्रेस उमेदवाराला विरोध दर्शवला आहे. सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघाच्या काँग्रेस नवीनचंद्र बांदिवडेकर यांचे सनातन संस्थेशी संबंध असल्याचे सांगत अशा उमेदवाराला दिलेल्या उमेदवारीचा काँग्रेसने फेरविचार करावा असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हणले आहे.

सनातन संस्थेवर नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश यांच्या हत्या घडवल्याचे आरोप होतात. अशा हिंदुत्ववादी संस्थेशी संबंधित असणाऱ्या व्यक्तीला काँग्रेसने तिकीट देणे योग्य नाही. तसेच हे काँग्रेसच्या विचारधारेला शोभणारे नाही असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. एका मराठी वृत्तवाहिनीवर त्यांनी सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघाचा उमेदवार बदलनाची देखील मागणी केली आहे.

मंगळवारी काँग्रेसने रात्री उशीला आपल्या उमेदवारांची एक यादी जाहीर केली आहे. त्या यादीत सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघातून नवीनचंद्र बांदिवडेकर यांचे नाव जाहीर केले आहे. त्या नावाला जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच काँग्रेसने सिंधुदुर्ग रत्नागिरीसाठी जाहीर केलेल्या उमेदवाराच्या नावावर पुनर्विचार करावा असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हणले आहे.

You might also like