Jitendra Awhad On Pawar Family | शरद पवारांचं घर कोणी फोडलं? अनंत गीतेंनंतर जितेंद्र आव्हाडांचा देखील ‘त्याच’ नेत्यावर गंभीर आरोप, अल्लाहची घेतली शपथ

रायगड : पोलीसनामा ऑनलाईन – Jitendra Awhad On Pawar Family | एका घरात पाच-पाच पदं देऊनही तुम्ही त्यांचे घर फोडलंत. शरद पवार (Sharad Pawar) यांचे घर फोडण्याचे काम कोणी केले असेल तर ते सुनील तटकरेंनी (Sunil Tatkare) केले आहे. मी अल्लाहला साक्षी मानून खूप गांभीर्याने हे वक्तव्य करत आहे. मी ठामपणे दावा करतो की, तटकरेंनीच शरद पवारांचे घर फोडले. शरद पवार यांच्या घरात कोणी भींत उभारली असेल तर ती तटकरेंनीच उभारली, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. यापूर्वी असाच आरोप रायगडमध्ये (Raigad) बोलताना शिवसेना नेते (Shivsena Leader) अनंत गीते (Anant Geete) यांनी केला होता.

महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi-MVA) रायगड लोकसभेचे उमेदवार (Raigad Lok Sabha) आणि ठाकरे गटाचे (Shivsena UBT) माजी खासदार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ रायगडमधील मोर्बा येथे मविआची जाहीर सभा पार पडली. या सभेला ज्येष्ठ नेते शरद पवार प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तसेच शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) देखील उपस्थित होते. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड बोलत होते.(Jitendra Awhad On Pawar Family)

आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, तटकरेजी शरद पवारांनी तुम्हाला काय कमी केले होते? तुम्हाला मंत्री बनवले.
शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी तुमच्या मंत्रिपदाला विरोध केला होता.
तरीदेखील शरद पवार यांनी तुम्हाला मंत्री केले. खरे तर जयंत पाटील हे तुम्हाला चांगलेच ओळखतात. त्यामुळेच ते शरद पवारांना म्हणाले होते की, तटकरेंना मंत्रिपद देऊ नका. परंतु, शरद पवार यांनी तुम्हाला, तुमच्या मुलीला, तुमच्या मुलाला, तुमच्या भावाला आणि तुमच्या भावाच्या मुलालाही पद दिले.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, येत्या निवडणुकीत सर्व पाकिटमारांचा हिशेब होईल.
मला एक गोष्ट कळत नाही की, ज्यांनी लोकांच्या घरावर दरोडे टाकले, चोरी केली तरी त्यांना सुखाची झोप कशी काय
लागते तेच मला समजत नाही. मला या मंचावरून सुनील तटकरेंना विचारायचे आहे की, तुम्हाला शरद पवार यांनी काय
कमी केले होते ते आम्हाला सांगा.

तटकरेंवर घणाघात करताना जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, आधी तुम्ही दिवंगत माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुलेंना झोपवलेत.
आता त्यांच्या मुलाच्या, पुतण्याच्या की जावयाच्या खांद्यावर हात टाकून फिरत आहात.
आज अंतुले वरून बघत असतील तर त्यांच्या डोळ्यात अश्रू येत असतील.

दरम्यान, यावेळी उपस्थित लोकांनी आव्हाड यांना सांगितले की, तो अंतुलेंचा जवई आहे.
त्यावर आव्हाड म्हणाले, पुतण्या असो वा जावई तो ए. आर. अंतुलेंचीच ओळख सांगतो ना, मला त्यांचे नाते माहीत नाही, असे आव्हाड म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Reliance Jio | डाटा वापरात चायना मोबाईलला मागे टाकून रिलायन्स जिओ बनला जगातील सर्वात मोठा मोबाईल ऑपरेटर

Devachi Uruli Garbage Depot | देवाची उरुळी कचरा डेपोतील लॅन्डफिलिंग व रामटेकडी प्रक्रिया प्रकल्पात ‘गोलमाल’ प्रकरणाची चौकशी करणार – अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी.पी.