Jitendra Awhad | ठाण्यातील ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा प्रयोग बंद पाडल्याप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांची नोटीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटाचा प्रयोग त्यांनी बंद पाडला होता. त्यामुळे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना पोलिसांची नोटीस आली आहे.

ठाण्यातील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात आमदार जितेंद्र आव्हाड आपल्या कार्यकर्त्यांसोबत आले आणि त्यांनी ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा प्रयोग बंद पाडला. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांना देखील मारहाण झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी आव्हाडांना नोटीस बजावली आहे. गेले काही दिवस ‘हर हर महादेव’ चित्रपटावरुन राज्यात वादंग सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, संभाजी ब्रिगेड आणि छत्रपती संभाजी महाराज आदी लोक या चित्रपटाच्या विरोधात आहेत. या चित्रपटात इतिहासाची मोडतोड केल्याचा दावा त्यांच्याकडून केला जात आहेत. तसेच आगामी काळत असे चित्रपट बनविल्यास गाठ माझ्याशी आहे, असे देखील संभाजी महाराज म्हणाले आहेत.

ठाण्यातील प्रयोग बंद पाडल्याप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या 100 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांवर कलम 141 नुसार गुन्हा दाखल करुन त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आव्हान करण्यात आले आहे. या मारहाणीचा एक व्हिडिओ प्रसारीत होत आहे. या व्हिडिओद्वारे पोलिसांनी ओळख पटवली असून, जवळपास 50 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांना नोटीस बजावली गेली आहे.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी एका प्रेक्षकालाही मारहाण केली.
या प्रेक्षकाला मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.
फिर्यादी प्रेक्षक विजय दुर्वे (Vijay Durve) यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
चित्रपट बंद पाडल्यामुळे दुर्वे यांनी तिकीटाचे पैसे मागितले होते.
दुर्वे हे मनसेचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी आणि मनसेमध्ये वाद निर्माण झाला आहे.

Web Title :-  Jitendra Awhad | police notice to jitendra awhad in case of har har mahadev movie beating mns worker

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | रिव्हर्स घेताना कार घातली अंगावर; डॉक्टर महिलेवर गुन्हा दाखल

Deepali Sayyad | ठाकरे गटाला मोठा धक्का! दीपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार; केले गंभीर आरोप