Jitendra Awhad Reaction On Raj Thackeray | जितेंद्र आव्हाडांचं राज ठाकरेंना खुलं आव्हान; म्हणाले – ‘मदरशात दाढीचा वस्तरा जरी सापडला तरी राजकारण सोडेन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Jitendra Awhad Reaction On Raj Thackeray | मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पक्षाच्या पाडवा मेळाव्यात मदरश्यांबाबत (Mumbra Madarsa) केलेल्य विधानाचा राष्ट्रवादीचे नेते (NCP Leader) आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी खरपूस समाचार घेतला आहे. पंतप्रधानांना (PM) माझी विनंती आहे की, त्यांनी मदरशांमध्ये धाडी टाकाव्यात. या मदरश्यांमध्ये काय सापडेल ना ते पाहून धडकी भरेल, असं विधान राज ठाकरे यांनी केले. यावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर देत मदरश्यात दाढीचा वस्तरा जरी सापडला तरी राजकारण (Politics) सोडेन, असं खुलं आव्हान राज ठाकरेंना दिले आहे. (Jitendra Awhad Reaction On Raj Thackeray)

 

जितेंद्र आव्हाड म्हणाले, जो माणूस प्रगतीशील वाटायचा. माझ्याकडे महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट (Maharashtra Development Blueprint) आहे. आपल्याकडे महाराष्ट्राच्या विकासाचा फॉर्म्युला आहे, असं सांगून महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याची भाषा करणारे राज ठाकरे मशिदीच्या बाहेर पोरांना बसवतात हे प्रगती आहे का अधोगती आहे कळत नाही, असा टोला लगावतानाच मुंब्र्याच नाव का घेतलं मला समजलं नाही, माझं त्यांना जाहीर आवाहन आहे, सकाळी लवकर उठून मुंब्र्याच्या कोणत्याही मदरशात या. मदरश्यात दाढीचा वस्तारा सापडला तरी मी राजकारण सोडेन, अस खुलं आव्हान त्यांनी राज ठाकरे यांना दिले.

 

 

मुंब्र्याला बदनाम करु नका

राज ठाकरे यांनी मुंब्र्याबद्दल कारण नसताना जातीयवादी विधान केले. माझं राज यांना जाहीर आव्हान आहे की, त्यांनी माझ्यासोबत मुंब्र्यातील कोणत्याही मदरशात यावे दाढीचा वस्तारा सापडला तरी राजकारण सोडून देईल. मुंब्र्यात काही शतक हिंदू (Hindu) मुसलमान (Muslim) प्रेमाने राहतात, मुंब्र्याला बदनाम करु नका, असे ट्विट आव्हाड यांनी केले आहे.

 

 

कामावर मत देतात जातीवर नाही

कळवा-मुंब्रा या मतदार संघात (Kalwa-Mumbra Constituency) 67 टक्के हिंदू आहेत आणि 33 टक्के मुसलमान त्यात मी 75 हजार मतांनी विजयी झालो. कळव्यातून 30 हजार मतांची आघाडी आणि मुंब्र्यातून 45 हजार मतांची आघाडी. लोक कामावर मत देतात जातीपातीवर नाही. 18 तास राबावे लागते. शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावे लागते, असेही आव्हाड यांनी म्हटलं.

 

 

Web Title :- Jitendra Awhad Reaction On Raj Thackeray | jitendra awhad reaction on raj thackeray speech madarsa mumbra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nora Fatehi Bold Hot Photos Videos | डीप नेक ड्रेसमध्ये नोरा फतेहीनं फ्लॉन्ट केला छातीवरचा ‘तिळ’, फोटो पाहून चाहत्यांच्या हृद्याचे वाढले ठोके !

 

Kangana Ranaut Killer Look | कंगना रानौतनं पर्पल शिमरी थाई-हाई स्लिट गाऊन घालून दिल्या किलर पोज

 

Post Office Started New Service | पोस्ट ऑफिसने सुरू केली नवीन सेवा ! आता घरबसल्या PPF, RD, सुकन्या समृद्धीमध्ये (SSY) करा गुंतवणूक