RSS विधानसभेत जितेंद्र आव्हाडांच ‘पानीपत’ करणार ; मुंब्रा, कळव्यात 1000 स्वंयसेवक ‘तैनात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुढील निवडणूकीसाठी आता सक्रीय झाला आहे. युतीच्या जागा वाटपात मुंब्रा, कळवा विधानसभा क्षेत्र शिवसेनेकडे असले तरी या विधानसभा क्षेत्रात आरएसएस सक्रीय झाला आहे. याला कारण देखील तसेच आहे, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड. या मतदार क्षेत्रात जितेंद्र आव्हाड यांना शह देण्यासाठी आरएसएसने तयारी सुरु केली आहे. त्यासाठीची मोर्चाबांधणी करण्यास संघाने सुरुवात केली असून आता आरएसएसचे 1 हजार स्वयंसेवक सज्ज झाले आहेत.

संघ आखतोय रणनिती –
कळव्यातील ब्राम्हण सभेच्या सभागृहात यासाठी नुकतीच एक बैठक पार पडली, भाजपचे प्रदेश संघटक आणि संघाचे माजी पदाधिकारी विजय पुराणिक उपस्थित होते. धक्कादायक बाब म्हणजे या मंडळींनी राष्ट्रवादीचे नगरसेवक मुकूंद किणी यांच्या घरी चहापण केले.

जितेंद्र आव्हाड यांनी कायमच भाजप सेनेच्या नेत्यांवर आणि भाजपच्या धोरणांवर समाजमाध्यमातून टीका केली. लोकसभेत दिग्विजय आणि कन्हैया कुमारचा ज्यापद्धतीने पराभव केला त्या पद्धतीने राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांचा पराभव करण्याची रणनीति भाजप आखत आहे.

युतीच्या जागावाटपात ही जागा जरी शिवसेनेला गेली असली तरी, भाजप येथून मोर्चा बांधणी करत आहे.

अशी असेल भाजप आणि संघाची रणनीति –
आव्हाडांचा सरळ लढतीत विजय मिळवणे ही अवघड असल्याचे भाजपला माहित आहे, याचसाठी भाजप सेना मुंब्रातून एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीला बळ देण्याचा प्रयत्न करणार आहे.याशिवाय भाजप कळवातील ब्राम्हण मते सेनेकडे वळण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणूनच कळव्याता ब्राम्हण सभेच्या सभागृहात घेण्यात आलेली बैठक त्याच रणनीतीचा एक भाग असल्याचे सांगितले जात आहे.
मुस्लिम मतांचे विभाजन आणि ब्राम्हण समाजाची मोट बांधून सेना विजयाचा पताका फटकवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे.

आरोग्य विषयक वृत्त – 

झोपेत असताना कुणी छातीवर बसल्यासारखे वाटलेय का ?

रात्री बेडवर पडल्यावर महिला कोणता विचार करतात ?

‘होम हेल्थ केअर’ची संकल्पना आणखी रूजायला हवी

घटस्फोटीत, विधुर पुरूषांना हृदयरोगाने मृत्युचा अधिक धोका

You might also like