पुरंदरेंना पद्मविभूषण दिला तर महाराष्ट्र पेटवू!

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केला. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र पेटवणार असा इशारा दिला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला भारत सराकारने बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण देण्याचे घोषित केल्यावर जितेंद्र आव्हाड यांनी याच्या निषेधात्मक ट्वीट केले.

महाराष्ट्र पेटवणार, परत एकदा. राज्यात शिव सन्मान परिषदा घेणार, सरकारने ब. मो. पुरंदरेंना सन्मानित करून शिवप्रेमींच्या जखमांवर मीठ चोळले, असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. त्यासोबतच या ट्विटमध्ये श्रीमंत कोकाटे, ज्ञानेश महाराव, सुषमा परदेशी यांचा उल्लेख आव्हाडांनी केला आहे.

ज्यांनी माँसाहेब जिजाऊंची बदनामी करणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या, अशा लोकांना का मोठे करत अहात. महाराजांची बदनामी करणाऱ्यांना सरकार पोसत आहे. तसंच महाराजांच्या इतिहासाची विकृती करणाऱ्या पुरंदरेंना परत पडद्यावर आणत असाल तर आम्ही वैचारिक पातळीवर महाराष्ट्र पेटवणार, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ज्यांनी केली महाराष्ट्राच्या अस्मितेची बदनामी, ते ह्या मनुवादी सनातन्यांचे मुकुटमणी, असंही त्यांनी म्हटलं आहे. २०१५ मध्ये बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. त्यावेळीही जितेंद्र आव्हाड यांनी त्याला विरोध केला होता.