जितेंद्र आव्हाडांविरुद्ध अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची भाजपची तक्रार, अडचण वाढणार ?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – पंढरपूरातील चैत्र एकादशी महापूजा प्रकरणानंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकारण रंगात आले आहे. ठाण्यातील एका तरुणाने मारहाणीचा आरोप केल्यानंतर आधीच चर्चेत असलेले गृहनिर्माण मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढवण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्यावर अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची तक्रार भाजपकडून करण्यात आली आहे.

सोलापूरचे पालकमंत्री असणार्‍या जितेंद्र आव्हाड यांनी 3 एप्रिल रोजी विठ्ठल मंदिरात न जाता संत चोखामेळा यांचे दर्शन घेउन त्यांचा जातिवाचक उल्लेख केला होता. भाजप माजी उपाध्यक्ष शिरीष कटेकर यांनी पोलीस ठाण्यात संत चोखामेळा यांचा जातीवाचक उल्लेख करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणून पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची तक्रार केली आहे. पंढरपूरातील चैत्र एकादशी महापूजा प्रकरणानंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकारण रंगणार असं दिसत आहे.
’जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकली म्हणून त्यांच्या संरक्षणासाठी असलेल्या सरकारी पोलिसांनी अभियंत्याला उचलून आणून बेदम मारहाण केली. त्यावेळी आव्हाड हे उपस्थित होते आणि त्यांच्यादेखत ही मारहाण केली गेली,’ अशी तक्रार ठाण्यातील एका तरुणाने केली आहे. हा तरूण पेशाने इंजीनिअर असून तो संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा कार्यकर्ता असल्याचे बोलले जात आहे.

You might also like