‘जितो पुणे’ला जागतिक पातळीवर नेणार : ओमप्रकाश रांका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात कोणतेही कार्य हाती घेतल्यास ते कार्य जागतिक पातळीवर जाण्यास जास्त वेळ लागत नाही. हे या शहराचे वैशिष्ट्य आहे. जितोच्या मध्यमातून पुणे शहरात वेगवेगळे उपक्रम रावबून जितो पुणेचे नाव जागतिक पातळीवर नेल्याशिवाय आमची टीम गप्प बसणार नाही, असे आश्वासन जितो पुणेचे अध्यक्ष ओमप्रकाश रांका यांनी व्यक्त केले.

जितो पुणेच्या मार्केट यार्डातील गंगाधाम चौकात असलेल्या सॉलिटेयर वर्ल्ड येथील नवीन कार्यालयाचे उद्घाटन सोलिटेयर वर्ल्डचे अशोक चोरडिया व उद्योगपती संजय शहा यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ओमप्रकाश रांका बोलत होते. यावेळी जितोचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विजय भंडारी, महाराष्ट्र अध्यक्ष कांतीलाल ओसवाल, राजेश सांकला, इंदर जैन, इंदर छाजेड, रमेश गांधी, अचल जैन, एस.के. जैन, देवीचंद जैन, अशोक हींगड, अजय मेहता, पंकज कर्नावट, चेतन भंडारी, संतोष जैन, यांच्यासह जीतो पुणेचे पदाधिकारी उपस्थित होते.

विजय भंडारी म्हणाले, जितोने नेहमीच समाज उपयोगी कार्य केली आहेत. साधर्मिक बांधवांसाठी जितो नगर, विद्यार्थ्यांसाठी जितो इंटर नॅशनल स्कुलची निर्मिती असेल किंवा पुढील काळात महिलांसाठी मुद्रा लोक उपलब्ध करुन देणे असेल व त्या मधील व्याजामध्ये त्यांना सवलत देणे असेल, असे अनेक कार्य सध्या जितोमध्ये प्रगती पथावर आहेत. तसेच जितोच्या वतीने डायग्रोपीनच्या सहकार्याने अनेक गरजूंना मोफत आरोग्य कार्ड देखील दिले जाणार असल्याचे भंडारी यांनी सांगितले.