‘जीव झाला येडापिसा’च्या शुटींगला सुरुवात ! ‘या’ दिवशी प्रसारीत होणार नवीन भाग

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळं सारं काही ठप्प झालं आहे. सिनेमांची आणि टीव्ही मालिकांची शुटींगही गेल्या अनेक दिवसांपासून बंदच होती. हळूहळू सारं काही अनलॉक होत आहे. अलीकडेच राजा रानीची गं जोडी आणि इतर काही मालिकांच्या शुटींगला सुरुवात झाल्याची माहिती समोर आली होती. अशात आता जीव झाला येडापिसा या मालिकेच्या शुटींगलाही सुरुवात झाली आहे. शुटींग सुरू करण्याआधी परिसर, मेकअप रूम्स, सेटचंही सॅनिटायजेशन करण्यात आलं आहे. सरकारनं आखून दिलेल्या नियमांचं पालन करत आणि योग्य ती काळजी घेत शुटींगला सुरुवात करण्यात आली आहे. चाहत्यांसाठी नक्कीच ही आनंदाची बातमी आहे.

लवकरच आता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यातील जोडी शिवा आणि सिद्धी यांना मालिकेच्या सुरुवातीपासूनच चाहत्यांचं मोठं प्रेम मिळत आहे. लॉकडाऊनच्या काळात प्रेक्षक या जोडीला खूप मिस करत होते. आता प्रेक्षक पुन्हा एकदा मालिकेचे नवीन भाग पाहू शकणार आहेत.

मालिकेच्या नवीन भागांबद्दल बोलायचं झालं तर येत्या 21 जुलैपासून आता प्रेक्षक या मालिकेचे नवीन भाग पाहू शकतील. ही बातमी कळताच अनेक चाहते आनंदित झाले आहेत आणि मालिकेबद्दलची त्यांची उत्सुकताही वाढली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like