युद्ध न करता अशा प्रकारे भारताला मिळू शकतो PoK, J & K चे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सांगितलं (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्याच्या निर्णयानंतर आता पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा (POK) सातत्याने चर्चिला जातोय. भाजपचे अनेक नेते यासंदर्भात वक्तव्ये करताना दिसत आहेत. अशातच जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी बुधवारी म्हटले की भारत युद्ध न लढता पीओकेला त्याचा भाग बनवू शकतो. एका कार्यक्रमात संबोधित करताना राज्यपालांनी सांगितले की बरेच सरकारी मंत्री पीओके मिळवण्यासाठी पाकिस्तानवर आक्रमण करण्याविषयी बोलत आहेत पण काश्मिरमध्ये चांगली प्रगती करून पीओकेला भारताचा भाग आपोआप बनविता येईल. मलिक म्हणाले की काश्मीरमधील विकासाची गती अधिक तीव्र करणे आवश्यक आहे, जेणेकरुन पीओकेचे लोक बंडखोरी करण्याचे प्रमाण कमी करतील.

राज्यपाल पुढे म्हणाले, “गेल्या पंधरा दिवसांपासून आमच्या अनेक मंत्र्यांना आंतरराष्ट्रीय विषयावर बोलण्याची संधी न मिळाल्याने, ते पीओकेच्या विषयावर बोलत आहेत. ही त्यांची विचारसरणी आहे. माझा विश्वास आहे की जर आपले पुढील लक्ष्य पीओके असेल तर सशस्त्र लढा देण्याऐवजी आम्ही जम्मू-काश्मीरच्या प्रगतीच्या आधारे ते नकीच मिळवू शकतो.

राज्यपाल मलिक पुढे म्हणाले, ‘जर आपण जम्मू-काश्मीरमधील लोकांना आदर देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे करू शकतो, त्यांना देशातील सर्वोत्तम नागरिक बनवू शकतो, इथल्या मुलांचे रक्षण करून काश्मीरमध्ये व्यवसाय आणि समृद्धी आणू शकतो. तसेच पीओकेमध्येच येथील गरजेइतकी वीज निर्मिती केली गेली तर मी हमी देतो की POK मध्ये वर्षभरात परिवर्तन होईल आणि लढा न देता तुम्हाला मिळेल. असे झाल्यास पीओकेचा प्रत्येक नागरिक भारताच्या दिशेने वळेल. माझी पीओके बाबत भूमिका जम्मू आणि काश्मीरच्या विकासाची आहे.

Visit – policenama.com