JK Terrorist Attack | काश्मीर खोऱ्यात 24 तासात 4 दहशतवादी हल्ले; जवान ठार, काश्मिरी पंडितासह 6 जखमी

श्रीनगर : वृत्तसंस्था – काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हल्ले (JK Terrorist Attack) काही थांबण्याचे नाव घेईनात. गेल्या 24 तासात खोऱ्यात विविध ठिकाणी सुरक्षा दल (Security Forces) आणि नागरिकांना लक्ष्य करत दहशतवाद्यांनी 4 हल्ले (JK Terrorist Attack) केले आहेत. या हल्ल्यांमध्ये एक जवान ठार (Soldier Death) झाला आहे तर अन्य एक जवान, काश्मीरी पंडितासह (Kashmiri Pandit) चार मजूर जखमी झाले आहेत. पुलवामा जिल्ह्यात (Pulwama District) दोन, शोपियान जिल्ह्यात (Shopian District) एक आणि श्रीनगरमध्ये (Srinagar) एक हल्ला करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शोपियान जिल्ह्यातील छोटीगाम गावात सोमवारी रात्री एका औषध विक्रेत्या (Pharmacists) काश्मिरी पंडितावर दहशतवाद्यांनी हल्ला (JK Terrorist Attack) केला. बाल कृष्ण उर्फ सोनू कुमार बालाजी (Bal Krishna alias Sonu Kumar Balaji) असे हल्ला झालेल्या पंडिताचे नाव आहे. बालाजी यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर पोलीस आणि सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आहे. गेल्या 24 तासांमधील हा चौथा हल्ला आहे . तर दिवसभरात एकूण तीन दहशतवादी हल्ले झाले आहेत. यापूर्वी दहशतवाद्यांनी जे तीन हल्ले केले होते त्यात बिगर काश्मिरी कामगार (Kashmiri Workers) आणि काश्मिरी व्यावसायिकांना लक्ष्य करण्यात आलं होतं.

 

पुलवामा येथे दोन गैर स्थानिक कामगारांवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. यात दोन जण जखमी झाले असून पातालश्वर कुमार यांचा मुलगा जोको चौधरी आणि जोको चौधरी यांचा मुलगा थौग चौधरी अशी त्यांची नावे आहेत. हे सर्व बिहारचे (Bihar) रहिवासी आहेत.
तर रविवारी झालेल्या हल्ल्यात ट्रक चालक आणि त्याचा सहाय्यक जखमी झाला.
सुरेंद्र सिंग यांचा मुलगा बिशन सिंग आणि डेप्युटी ड्रायव्हर
धीरज दत्त यांचा मुलगा सुशील दत्त अशी त्यांची नावं असून दोघेही हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh)
नूरपूर कांगडा येथील रहिवासी आहेत. दरम्यान,
दहशतवाद्यांनी आता परराज्यातील लोक आणि काश्मीरी पंडितांना लक्ष्य केले असल्याचे समोर आले आहे.

Web Title :- JK Terrorist Attack | four terrorist attacks in kashmir in 24 hours targeted on kashmiri pandit JK Terrorist Attack


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

ST Workers Strike | एसटी कामगारांचा संप मिटेना ! कमतरता भरून काढण्यासाठी ST महामंडळाने घेतला ‘हा’ निर्णय

Diabetes | डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी आजपासूनच सुरू करा ‘हे’ 5 घरगुती उपाय; जाणून घ्या

Anti Corruption Bureau (ACB) Mumbai | 3 लाखाची लाच घेताना BMC चा अधिकारी व लेबर अँटी करप्शनच्या जाळ्यात; प्रचंड खळबळ