JLN Hospital | दुर्दैवी ! मुंबईच्या निवासी डॉक्टराची इंजेक्शन घेऊन आत्महत्या, वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ

अजमेर : पोलीसनामा ऑनलाइन – JLN Hospital | जवाहरलाल नेहरु (JLN Hospital) रुग्णालयातील एका निवासी डॉक्टराने इंजेक्शन घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. शुक्रवारी (दि. 25) रात्री ही घटना उघडकीस आली आहे. मृत निवासी डॉक्टर हा मुंबईचा रहिवासी आहे. दरम्यान त्याच्या खोलीत कोणतीही सुसाईड नोट (Suicide note) सापडली नाही. मात्र पोलिसांनी या संपूर्ण घटनाक्रमाची व्हिडिओ रेकॉर्डिंग (Video recording) केली आहे. तसेच संपूर्ण खोलीची तपासणी फॉरेन्सिक सायन्स प्रयोगशाळेतील तज्ज्ञांकडून केली आहे. दरम्यान या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

डॉ. अक्षय कुमार अंकारे (मूळ रा. मुंबई) असे मृत डॉक्टरचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. अक्षय हा जवाहरलाल नेहरु मेडीकल कॉलेजमध्ये ईएनटी यूनिटमध्ये शिकत होता. आत्महत्येपूर्वी तो रुग्णालयात आला आणि हातात कॅन्युला लावला. त्यानंतर घरी गेल्यानंतर त्याने ड्रिपच्या साहाय्यानं स्वतःला इंजेक्शन देत आत्महत्या केली. दरम्यान अक्षयचे मित्र त्याला सारखे फोन करत होते. मात्र तो फोनला प्रतिसाद देत नव्हता. शेवटी काही मित्र त्याच्या घरी गेले.

अक्षयच्या घराचा दरवाजा आत मधून बंद होता. पण आतमधून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. बराच वेळ झाल्यानंतर अक्षयच्या मित्रांनी वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही अक्षयला फोन केला. पण त्यांचाही फोन त्याने उचलला नाही. त्यानंतर अधिकाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत अक्षयच्या खोलीचा दरवाजा तोडला. तेव्हा डॉ. अक्षय खोलीत पडला होता. सहकाऱ्यांनी त्याला तपासले असता. त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान डॉक्टरांनी सांगितलं की, तो अभ्यासात खूप हुशार होता. गेल्या वर्षभरापासून त्याने कोरोना रुग्णावर उपचार केले होते. तसेच गेल्या काही दिवसांपासून तो ब्लॅक फंगसच्या रुग्णांचे ऑपरेशन आणि वॉर्डमध्ये काम करत होता.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : JLN Hospital | mumbai based doctor suicide jln hospital ajmer using cannula

हे देखील वाचा

Hot Yoga Teacher | अभिनेत्रींपेक्षाही हॉट योगा टीचर ! काम करून महिन्याला कमवते ‘एवढे’ लाख रूपये, तुम्ही विचार देखील नाही करू शकत

Pimpri News | ‘मी तुझ्यासाठी झुरतोय’ म्हणत दीड वर्ष केला तरूणीचा पाठलाग; मजनू बनलेल्या तरूणाला अखेर…

Secret Affair | आरोग्यमंत्र्याचं महिला सहकार्‍यासोबत ‘लफडं’? ऑफिसच्या बाहेरच ‘चुंबन’ घेताना झाले CCTV मध्ये कैद