Jnana Prabodhini Prashala | ‘प्रतिमा उत्कट रंग कथा 23’ चित्र प्रदर्शनात स्टील लाईफ प्रात्यक्षिक

ज्ञान प्रबोधिनी प्रशाला माजी विदयार्थी मंडळाचे आयोजन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Jnana Prabodhini Prashala | ज्ञान प्रबोधिनी प्रशाला माजी विदयार्थी (Dnyan Prabodhini Prashala Ex-Student Board) मंडळाच्या – कला आणि संस्कृती विशेष उद्दिष्ट गटाने ‘आर्टिस्ट कट्टा ‘ या संस्थेच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ‘प्रतिमा उत्कट – रंग कथा २३ ‘ या चित्र प्रदर्शनात ९ जून रोजी सकाळी साडे दहा वाजता सुरभी गुळवेलकर-साठे (Surabhi Gulwelkar-Sathe) यांचे ‘ स्टिल लाईफ ( स्थिरचित्र ) विषयावरील प्रात्यक्षिकाला चांगला प्रतिसाद मिळाला. मिलिंद संत (Milind Sant) यांनी गुळवेलकर यांचे स्वागत केले. अस्मिता अत्रे यांनी प्रास्ताविक केले. (Jnana Prabodhini Prashala)

गुळवेलकर म्हणाल्या, ‘ स्टिल लाईफ( स्थिर चित्र) प्रकारात ठेवलेल्या स्टीलचे भांडे, सिरॅमिक भांडे, फळ, कापड या प्रत्येकातून प्रकाशाचे होणारे परावर्तन टिपणे हे कलाकाराचे कौशल्य असते.स्थिरचित्रात त्रिमिती रचनेचे रेखाटन महत्वाचे असते, नंतर छाया -प्रकाशाचे काम आधी करणे आणि नंतर डिटेलिंग करणे महत्वाचे ठरते. (Jnana Prabodhini Prashala)

‘प्रतिमा उत्कट- रंगकथा २३’ हे चित्र प्रदर्शन दि.८ ते ११ जून २०२३ या काळात बालगंधर्व कला दालन, पुणे (Balgandharva Kaladalan Pune) सकाळी १० ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहील. या प्रदर्शनाचे वैशिष्टय़ म्हणजे यामधे ८० हून अधिक कलाकारांनी विविध विषयांवर विविध माध्यमातून काढलेली चित्रे प्रदर्शित केली आहेत.दुसरे वैशिष्टय़ म्हणजे हे कलाकार वय वर्षे १० ते ८५ अशा विविध वयोगटातील आहेत. तसेच विशेष नमूद करण्यासारखी बाब म्हणजे यातील काही कलाकार नागरी वस्तीतील आहेत तर काही दिव्यांग माजी सैनिक आहेत.

 

 

Advt.

याशिवाय प्रत्येक दिवशी प्रदर्शनाबरोबरच अनेक मान्यवर कलाकारांची
प्रात्यक्षिके आणि संवाद सत्रे आयोजित केलेली आहेत. त्यात ९जून रोजी
सायंकाळी साडे पाच वाजता चंद्रमोहन कुलकर्णी यांच्याबरोबर संवाद,
१० जून रोजी सकाळी साडे दहा वाजता दीपककुमार शर्मा यांचे प्रात्यक्षिक,
सायंकाळी साडे पाच वाजता मिलिंद मुळीक (Milind Mulik)
आणि मंजिरी मोरे (Manjiri More) यांच्याबरोबर संवाद,
११ जून रोजी सकाळी साडे दहा वाजता सायली भगली-दामले यांचे प्रात्यक्षिक, सायंकाळी ४ वाजता डॉ मुक्ता अवचट-शिर्के (Dr. Mukta Awachat-Shirke) यांचे प्रात्यक्षिक अशी विविध सत्रे होणार आहेत. ११ जून रोजी सायंकाळी ६ वाजता समारोप कार्यक्रम होणार आहे.

 

Web Title : Jnana Prabodhini Prashala | Still life demonstration at ‘Pratima Utkat Rang Katha 23’ photo exhibition

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा