धुळे : JNU मध्ये झालेल्या हल्याचा ABVP च्या वतीने पुतळा जाळून निषेध

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – जवाहरलाल नेहरु विद्यापिठात झालेल्या हल्ल्याचा जयहिंद महाविद्यालय प्रवेशद्वारावर अभाविप च्या कार्यकर्त्यांकडून वामपंथीयांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात काही SFI, AISF कार्यक्रते घुसून अभाविपच्या कार्यकर्त्यांवर हल्ले करत सामान्य विद्यार्थ्यांला मोठ्या प्रमाणात भीती दाखवण्याचे काम करत आहे. विद्यापीठात दगड, लोखंडी सळ्या, लाठी-काठ्यांनी अभाविपच्या कार्यकर्त्यांवर हल्ले करण्यात आले. यात २५ पेक्षा अधिक अभाविपचे कार्यकर्ते गंभीर जखमी झालेले आहेत. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून 6 जानेवारी रोजी अभाविपच्या नाशिक कार्यालयावर हल्ला करण्यात आला. तसेच 7 जानेवारी रोजी अभाविपच्या पुणे येथील प्रदेश कार्यालयावर हल्ला करून अभाविपच्या फलकाला काळा फासण्याचे काम केले आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश मंत्री स्वप्नील बेगडे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते नेहमी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा लोकसभेत मारत असतात. परंतु त्यांचे कार्यकर्ते अशा घटनांच्या आधारे आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी व प्रसिद्धीसाठी असले धंदे करत आहेत. याचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तीव्र निषेध करते. तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कायदा व सुव्यवस्था राखण्यामध्ये अपयशी ठरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या हातचे बाहुले बनून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काम करत आहेत. त्यांचा प्रशासन व पोलिसांवर कुठल्याही प्रकारचा वचक राहिलेला नाही याचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तीव्र निषेध करते. असे बेगडे म्हणाले.

यावेळी शंहर मंत्री निलेश गिळे, भावेश भदाणे, चेतन अहिरराव, राजेंद्र पाटील, विजय पंचारिया कांतीलाल कल्पना चौधरी, आदित्य कुलकर्णी, वैष्णवी मराठे, अनुज वाघ, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/