जेएनयू हल्ला प्रकरण : अभाविपच्या विरोधात नांदेड एसएफआय शहर कमिटीचे तीव्र आंदोलन

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन (माधव मेकेवाड) – दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्राध्यापक, विद्यार्थी व विद्यार्थी संसद अध्यक्ष आयशी घोष यांच्यावर ५ जानेवारी रोजी विद्यापीठात घुसून अचानकपणे हल्ला केला गेला. लोखंडी रॉड, काठ्या, दगडाच्या साहाय्याने विद्यार्थ्यांच्या डोक्यावर, शरीरावर गंभीर मारहाण केली. या मारहाणीत जेएनयू विद्यार्थी संसदेच्या अध्यक्ष आयशी घोष व प्राध्यापक सुचरिता सेन यांच्या डोक्यावर जबर मार बसला असुन त्यांना रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे सर्व भयावहच होते.

या अभाविपच्या कृत्याच्या विरोधात व निषेध करण्यासाठी तसेच या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करुन त्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी या मागणीला घेऊन नांदेड एसएफआय शहर कमिटीच्यावतीने  ७ जानेवारी रोजी महात्मा फुले पुतळा, आयटीआय चौक, नांदेड येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.

यावेळी एसएफआयचे राज्य अध्यक्ष बालाजी कलेटवाड, मीना आरसे, विकास वाठोरे, शहराध्यक्ष स्वप्निल बुक्तरे, शंकर बादावाड, रत्नदिप कांबळे, परमेश्वरी उंबरकर, संजना धुमाळे, संध्या लोकडे, प्रथम तारु, अक्षय वाघमारे, विक्की कांबळे, मनिष सावंत, अमित गजभारे, अक्षय गायकवाड, इम्रान शेख, रोहन नवघडे, किशोर बुक्तरे, शुभम रायपलवार, महेद्र इंगोले आदींची उपस्थिती होती.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/