JNU प्रकरण : ‘भारत, ज्या देशात विद्यार्थ्यांपेक्षा गायींना अधिक सुरक्षा मिळते’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कॅम्पसमधे रविवारी (दि 5 जानेवारी) विद्यार्थ्यांवर हल्ला झाला. या हल्ल्यात 20 विद्यार्थी जखमी झाले. या हल्ल्यानंतर सर्वत स्तरातून याचा निषेध झाला. क्रिकेट आणि बॉलिवूडमधूनही या घटनेचा निषेध होताना दिसत आहे. अभिनेत्री ट्विंकल खन्नानेही याचा निषेध नोंदवला आहे. तिने याबाबत ट्विट केलं आहे.

एका वर्तमानपत्राची बातमी ट्विटरवर शेअर करत ट्विंकल खन्ना म्हणाली, “भारत, ज्या देशात विद्यार्थ्यांपेक्षा गायींना अधिक सुरक्षा मिळते. पण हा तोच देश आहे ज्याने कोणाच्या भीतीने जगण्यास स्पष्ट नकार दिला आहे. आपण हिंसा करून लोकांवर दबाव निर्माण करू शकत नाही. त्यामुळे अजून जास्त विरोध होणार, आंदोलन होणार, जास्त लोक रस्त्यावर उतरणार….”असं ट्विंकलने म्हटलं आहे.

या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध झाला आहे. मुंबईतही याचे पडसाद उमटले आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे तसेच गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही या घटनेचा निषेध केला. या हल्ल्यात जवळपास 20 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये विद्यार्थी, संघटनांचे नेते आणि शिक्षकांचाही समावेश आहे. विद्यापीठातील अनेक दालनांची मोडतोड करण्यात आली आहे. सर्वच जखमींना उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/