JNU ची माजी विद्यार्थी नेता शहला राशिदवर वडिलांनी केले खळबळजनक आरोप, म्हणाले – ‘मुलगी अँटी नॅशनल हालचालींमध्ये सहभागी’

श्रीनगर : जवाहर लाल नेहरू यूनिव्हर्सिटी (जेएनयू) ची माजी विद्यार्थी नेता शहला राशिदवर तिचे वडिल अब्दुल राशिद शोरा यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. शहलाच्या वडिलांनी दावा केला आहे की, त्यांची मुलगी अँटी नॅशनल हालचालींमध्ये सहभागी आहे. त्यांनी त्यांच्यासाठी ताबडतोब सिक्युरिटीची मागणी करत जम्मू-काश्मीर डीजीपींना पत्र लिहिले आहे. विशेष म्हणजे या पत्रात त्यांनी आपली मुलगी शहला राशिद, अस्मा आणि पत्नी जुबैदा शोरा यांच्याकडून जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. घरगुती वादातून अब्दुल राशिद शोरा हे विभक्त राहत आहेत.

तसेच अब्दुल यांनी जेएनयूच्या घटनेवर म्हटले की, हा पूर्ण खेळ फंडचा आहे. तर, शहला राशिदने आपल्या वडिलांचा दावा फेटाळत त्यांच्यावर आईचा छळ केल्याचा आरोप केला. शहला राशिदचे वडिल अब्दुल शोरा यांनी दावा केला आहे की, त्यांच्या मुलीने जम्मू-काश्मीर पीपुल्स मूव्हमेंटसाठी तीन कोटी रूपये घेतले. शहला एनजीओ सुद्धा चालवते आणि त्या एनजीओची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. लीगल डॉक्युमेंट्समध्ये ती स्वत: बेरोजगार असल्याचे सांगते, मग पैसा कुठून येतो. याची चौकशी झाली पाहिजे. सर्वांना समजले आहे की, फंडिंग कुठून येत आहे आणि का येत आहे. त्यांनी पुढे म्हटले की, मी तीन वर्ष तिला (शहला राशिद) समजावले.

शहलाने आरोप फेटाळले
दरम्यान, शहला राशिदने आपल्या वडिलांचे आरोप फेटाळले आहे. तिने म्हटले, तुमच्या पैकी अनेक लोकांना माझ्या वडिलांनी माझ्यावर, माझी बहिण आणि आईवर केलेल्या आरोपांचे व्हिडिओ पाहिले असतील. थोडक्यात आणि स्पष्टपणे सांगायचे तर ते आपल्या पत्नीला मारहाण करणारे, अपमानजनक व्यक्ती आहेत. आम्ही अखेर, त्यांच्या विरूद्ध कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे आणि हा स्टंट त्याचीच रिअ‍ॅक्शन आहे.

जेएनयूच्या घोषणांवर म्हणाले वडिल – हा फंडचा खेळ आहे
शहलाच्या वडिलांनी म्हटले की, जेएनयूमध्ये ज्या घोषणा दिल्या जातात, त्या दिल्या नाही पाहिजेत. हा सर्व खेळ फंडचा आहे. आपल्या पत्रात शहलाच्या वडिलांनी दावा केला आहे की, यूएपीएच्या अंतर्गत अटक होण्याच्या दोन महिने अगोदर जहूर वटाली आणि माजी आमदार राशिद इंजीनियरने मला बोलावले होते. त्यांनी बैठकी दरम्यान तीन कोटी रूपयांची ऑफर दिली. मला वाटले की हा पैसा अवैध मार्गाने येत आहे, तेव्हा मी ते पैसे घेतले नाहीत आणि मुलीला सुद्धा अशा कोणत्याही हालचालीत सहभागी न होण्यास सांगितले.

You might also like