‘कंडोम्स’ आणि ‘सेक्स टॉईज’चे ‘हे’ व्हायरल फोटो खरंच JNU गर्ल्स हॉस्टेलवरचे आहेत का ? काय आहे सत्य ? जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या सगळीकडे जेएनयु हल्ल्याचं प्रकरण चर्चेत आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध होताना दिसत आहे. अशातच आता जेएनयुच्या गर्ल्स हॉस्टेलवर सापडलेल्या काही वस्तू असल्याचं सांगत काही फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. यात सेक्स टॉईज, कंडोम्स, असं बरंच काही दिसत आहे. हे सगळं पाहून एकच प्रश्न समोर येतो तो म्हणजे हे फोटो खरंच जेएनयुमधले आहेत का ?

https://twitter.com/Shubham85395292/status/1214077388398743553

सध्या व्हायरल होणारे हे फोटो बारकाईने पाहिले तर लक्षात येत आहे की, हे फोटो फेक आहेत आणि जेएनयुमधले नाहीत. कारण हॉस्टेलमध्ये कोणत्याच जमीनीवर फोटोत दिसत आहे त्याप्रमाणे कारपेट नाही. याशिवाय फोटोत रुम हिटरही दिसत आहे. त्यावरून हे फोटो जेएनयुच्या हॉस्टेलमधले नसल्याचं लक्षात येतं. याशिवाय रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर आणि फोटो नेमके कुठले आहेत याचा शोध घेतल्यानंतर हे फोटो जुने असल्याचे समजते. यातील पहिला फोटो Reddit वर एका युजरने पोस्ट केला आहे. या युजरने रेडइटकडे हे स्पष्ट केलं आहे की, जेएनयुमधले म्हणून जे फोटो सोशलवर फिरत आहेत ते त्याने पोस्ट केलेले आहेत.

गुगलच्या रिव्हर्स इमेज सर्चचा वापर केल्यास समजतं की, दुसरा फोटो हा Imgur या वेबसाईटचा आहे. हा फोटो 2018 मधला आहे. हे दोन्ही फोटो जेएनयुमधले नसून ते फेक आहेत.

दरम्यान, जेएनयु हल्ल्याला तब्बल 72 तास उलटूनही या घटनेतील दोषींना अद्याप अटक झालेली नाही. दरम्यान काँग्रेसनेही याचा निषेध करत गृहमंत्र्यांवर आरोप केला आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले, “आपल्या सगळ्यांना माहिती आहे या घटनेमागे कोण आहे. या गुंडागर्दीला अधिकृत मान्यता देणारे गृहमंत्रीच आहेत. मनुष्यबळ मंत्रालयच या सगळ्यांना पाठिशी घालत आहे” असे ते म्हणाले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/