JNU देशातील ‘सर्वोत्तम’ विद्यापीठ, मोदी सरकारमधील ‘या’ मंत्र्यांकडून ‘कौतुक’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) भारतीय अर्थशास्त्र सेवेच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कौतुक केले आहे. भारतीय अर्थशास्त्र सेवेच्या परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या 32 पैकी 18 विद्यार्थी जेएनयूचे असल्याने अतिशय आनंद झाल्याचे निशंक यांनी म्हटलं आहे. शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात जेएनयू देशात कायमच अव्वल असल्याचे आपण अधीही म्हटलं होतं, असे त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

यूपीएससीच्या आयएएस परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची यादी 10 जानेवारी रोजी जाहीर झाली. या यादीमध्ये 32 विद्यार्थ्यांचा समावेश असून यामध्ये 18 विद्यार्थी जेएनयूचे आहेत. भारतीय अर्थशास्त्र सेवेत देशस्तरावर केवळ 32 जागा असतात. यामध्ये 18 जाग जेएनयू विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी मिळवल्या आहेत. त्यामळे जेएनयूल्या शिक्षणाचा दर्जा इतर विद्यापीठांपेक्षा सर्वात उत्तम असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

जेएनयूमध्ये 5 जानेवारीला हिंसाचार झाला होता. विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली होती. यावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि डाव्या संघटनांनी एकमेकांवर आरोप केले होते. या घटनेचे पडसात संपूर्ण देशात उमटले. त्यामुळे जेएनयू पुन्हा एकदा चर्चेत आले. जेएनयूमध्ये तुकडे गँग सक्रिय असल्याचा आरोप भाजप आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला. तर जेएनयू सर्वोत्तम विद्यापीठ गौरवणारं सरकार दुटप्पीपणांन वागत असून विद्यापीठाला उद्धस्त करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरु असल्याचा आरोप डाव्यांनी केला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like