राष्ट्रद्रोहाचा आरोपी JNU चा विद्यार्थी शरजील इमामला अटक, दिलं होतं देशविरोधी भडकाऊ भाषण

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  देशविरोधी आणि भडकाऊ भाषणे केल्याचा आरोप असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा  (जेएनयू) माजी विद्यार्थी शरजील इमामला  बिहारच्या जहानाबाद येथून दिल्ली आणि बिहार पोलिसांनी मंगळवारी दुपारी अटक केली आहे. यापूर्वी सोमवारी रात्री त्याच्या भावाला आणि मित्रांना अटक करण्यात आली हाती. शेरजीलला दिल्ली, बिहार , आसाम , अरुणाचल , मणिपूर आणि उत्तर प्रदेश पोलीस शोधत होती.  शरजील इमाम हा मूळचा बिहारच्या जहानाबादचा आहे.

 

 

शरजील इमामच्या प्रक्षोभक भाषणाचा व्हिडिओ व्हायरल

चार दिवसांपूर्वी शरजील इमामचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीच्या व्यासपीठावरून पूर्वोत्तर राज्य आसामला भारतापासून वेगळे करण्याचे बोलत आहे. त्याने म्हटले की, मुस्लिमांनी आपली ताकद दाखवून कमीत कमी एक महिन्यापर्यंत आसामचा संपर्क भारतापासून तोडला पाहिजे.

यासाठी रेल्वे ट्रॅकवर एवढा भराव टाकला पाहिजे की, तो काढता-काढता एक महिन्याचा कालावधी लागला पाहिजे. परंतु, या व्हिडिओच्या सत्यतेबाबत हे वृत्त देणार्‍या वृत्तवाहिनीने देखील साशंकता वर्तविली आहे. शरजील इमामवर प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.

 

फेसबुक पेज लाईक करा