मनमोहन सिंगांना काळे झेंडे दाखवणारा बनला राहुल गांधींचा सल्लागार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मनमोहन सिंह सरकारच्या काळात त्यांना अनेकांनी काळे झेंडे दाखवले होते. विशेष म्हणजे त्यावेळी मनमोहन सिंगांना काळे झेंडे दाखवणारा व्यक्ती आज राहुल गांधींचा सल्लागार झाला आहे. जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटीचे माजी छात्र संघाचे अध्यक्ष संदीप सिंह याने डाव्यांची साथ सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

मागील दीड वर्षापासून ते राहुल गांधी यांच्याबरोबर आहेत. ते राहुल गांधींचे सल्लागार असल्याचीही चर्चा आहे. राहुल गांधीसाठी ते भाषण लिहित असल्याचेही बोलले जात आहे. राज्यातील छोट्या छोट्या पक्षांशी काँग्रेसबरोबर आघाडी करण्यासाठी संदीप सिंह महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांना अद्याप काँग्रेस पक्षाकडून कोणतेही पद देण्यात आलेले नाही. संदीप सिंह यांची २००७ मध्ये जेएनयू छात्रसंघाचे अध्यक्षपदी निवड झाली होती. त्यांनी २००५ मध्ये जेएनयूच्या एका कार्यक्रमात तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांना काळे झेंडे दाखवले होते.

काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणात संदीप सिंह यांचं वजन वाढलं आहे. संदीप सिंह हे काँग्रेसच्या महासचिव आणि यूपीच्या प्रभारी प्रियंका गांधींनाही निवडणुकीसाठी मदत करत आहेत. प्रियंका गांधींबरोबर ते उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावरही दिसले होते. काँग्रेसला विरोध करणारे संदीप सिंह हे राहुल गांधींच्या फारच जवळ आले आहेत. २०१७ पासून संदीप सिंह राहुल गांधींच्या जवळपास घुटमळताना पाहायला मिळाले आहेत.

मध्यमवर्गातून आलेले संदीप सिंह यांनी अलाहाबाद युनिव्हर्सिटीतून पदवी मिळवली आहे. त्यानंतर जेएनयूच्या हिंदी विभागात अर्ज केला होता. २००५ मध्ये त्यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना काळे झेंडे दाखवले होते. संदीप सिंह हे कुशल वक्ते आहेत. जेएनयू सोडल्यानंतर त्यांनी डाव्यांपासून फारकत घेतली होती. २०११ मध्ये अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल लोकपाल आंदोलनाचा भाग बनले होते.