JNU Violence : हल्ल्यात जखमी झालेल्या JNUSU अध्यक्ष घोषसह 19 विद्यार्थ्यांच्या विरूध्द दिल्ली पोलिसांनी दाखल केली FIR

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जेएनयुमध्ये झालेल्या हिंसेबाबत स्टुडंट युनियन अध्यक्ष आइशी घोष समवेत 19 विद्यार्थ्यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. रविवारी तोंड लपवून काही बदमाशानी जेएनयु कॅम्पसमध्ये घुसून विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना लोखंडाच्या रॉडने मारहाण केली होती.यामध्ये ऐकून 34 विद्यार्थी जखमी झाले होते. ज्यामध्ये आईशी घोष यांचा देखील समावेश होता. मारहाणीमुळे घोष यांच्या डोक्याला मोठी जखम झाली होती.

4 जानेवारीला जेएनयूमध्ये सर्व्हर रूम तोडल्याप्रकरणी एफएनआयआर दाखल करण्यात आली होती, यामध्ये जेएनयूएसयूचे अध्यक्ष आइशी घोष आणि त्यांच्या 7 – 8 सहकाऱ्यांची नावे आहेत. एफआयआर जेएनयू प्रशासनाने 5 जानेवारी रोजी दाखल केले होते.

हिंदू रक्षा दलाने घेतली जबाबदारी
या हिंसेची पूर्ण जबाबदारी हिंदू रक्षा दलाने स्वीकारली आहे. एक व्हिडिओच्या माध्यमातून हिंदू रक्षा दलाचे अध्यक्ष पिंकी चौधरी यांनी सांगितले की मारहाण करणारे त्यांचेच कार्यकर्ते होते. जेएनयुमध्ये देशाविरोधात कार्यक्रम केले जातात हे त्यांना मान्य नाही देशा विरोधात जर कोणी कट रचत असेल तर त्याला अशाच प्रकारे उत्तर देणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले.

जेएनयुमध्ये कशी वाढली हिंसा
8 ऑक्टोबर रोजी विद्यार्थी संघटनांचे फी दरवाढी विरोधात आंदोलन सुरु होते. यानंतर विद्यार्थ्यांनी डिसेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षांना विरोध दर्शवलेला होता. दोन दिवस डाव्या विचार सरणीच्या विद्यार्थ्यांनी कंट्रोल रूमवर ताबा मिळवलेला होता आणि रजिस्ट्रेशन बंद करून ठेवलेले होते. यावेळी शेवटच्या काळामध्ये काही विद्याथी रजिस्ट्रेशन करण्यासाठी येत होते त्यावेळी विद्यार्थी संघटनांनी त्यांना अडवले आणि त्यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली. यावेळी तेथे अनेक शिक्षक देखील उपस्थित होते मात्र कोणीही विद्यार्थ्यांना मारहाण करू नका असे सांगितले नाही.

संध्याकाळ होताच कॅम्पसमध्ये घुसले नकाबधारी
साबरमती टी पॉइंटवर जेएनयु विद्यार्थी संघटनेतर्फे सभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते आणि आपले विचार मांडत होते. 6:30 वाजता चाळीस ते पन्नास जण तोंडावर नकाब घालून कॅम्पासमध्ये घुसले आणि त्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण सुरु केली.

मिळेल ते सामान तोडले
साबरमती टी पॉईंट येथे सभेचे आयोजन करताना एबीव्हीपी आणि जेएनयू विद्यार्थी संघटनेत हाणामारी झाली. यामुळे कॅम्पसमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यानंतर नकाब घातलेल्या लोकांनी साबरमती हॉस्टेलमध्ये तोडफोड केली तसेच अनेक गाड्या देखील यावेळी फोडण्यात आल्या.

आतापर्यंत काय झाली कारवाई
दिल्ली पोलिसांनी याबाबत आतापर्यंत तीन एफआयआर दाखल केले आहेत. यातील दोन जेएनयु प्रशासनाकडून करण्यात आलेले आहेत. तसेच दिल्ली पोलिसांनी अज्ञातांविरोधात दंगल भडकवल्याने आणि संपत्तीचे नुकसान केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.गृहमंत्रालयाने याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/