‘जोकर’च्या सीक्वलची तयारी, वॉकिन फीनिक्सनं साइन केली 367 कोटींची डील !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  टॉड फिलिप्स दिग्दर्शित हॉलिवूड चित्रपट ‘जोकर’ हा 2019 चा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर सिनेमा होता. यात आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणारा अभिनेता वाल्किन फिनिक्स लवकरच जोकरच्या सिक्वेलसह परत येणार आहे. होय, अशी बातमी आहेत की जोकरच्या 2 सीक्वेल्ससाठी वॉल्किनला 50 मिलियन डॉलर म्हणजेच 367 कोटींची डील ऑफर करण्यात आली आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक, अभिनेता किंवा निर्मात्याने जोकरच्या सिक्वेलवर योजना आखली नव्हती, पण क्रिटिकल आणि कमर्शियल यशानंतर वॉल्किन आणि टॉड दोघे जोकरच्या सिक्वेलकडे इशारा करत आहेत. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयासाठी वॉकीन फिनिक्सला अकादमीचा पुरस्कार मिळाला. ऑस्कर 2020 मध्ये, हे 11 वेगवेगळ्या प्रकारात नामांकन मिळाले होते. हा पहिला R रेटेड चित्रपट (17 वर्षाखालील वयासाठी बंदी घातलेला) सिनेमा होता ज्याने एक अब्जपेक्षा जास्त कमाई केली होती

द मिररच्या वृत्तानुसार, वॉल्किन फिनिक्स पूर्वी जोकरला स्टँड अलोन चित्रपट मानत असे, परंतु आता त्यांची विचारसरणी बदलली आहे. गेल्या वर्षीचा वाद असूनही त्याला पुन्हा हे पात्र पडद्यावर साकारायचे आहे. चित्रपटाच्या एका सूत्राने सांगितले की, तो मुद्दा अजूनही चर्चेत आहे. स्क्रिप्ट लिहिल्या जात आहेत आणि त्यात वाल्किन खूप व्यस्त आहे. दिग्दर्शक टॉड फिलिप्स, अभिनेता वाल्किन फिनिक्स आणि निर्माता ब्रॅडली कूपर यांच्या दीर्घकालीन प्रतिबद्धतेचा भाग म्हणून पुढील चार वर्षांत जोकरचे दोन सीक्वेल्स आणण्याची त्यांची योजना आहे.

निर्माता-अभिनेत्याने सिक्वेलविषयी दिले होते संकेत

काही काळापूर्वी एका मुलाखतीत ब्रॅडलीने सांगितले की टॉडने त्याला बोलवून डीसीच्या नवीन आवृत्तीवरील कल्पनेबद्दल सांगितले जे मूळ कथा जोकर आहे. त्याच वेळी वॉल्किनने लॉस एंजेलिस टाईम्सला दिलेल्या मुलाखतीतही म्हटले होते – ‘जोकर चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी किंवा त्याच्या यशाच्या आधी आम्ही त्याच्या सिक्वेलबद्दल बोललो होतो. जोकर चित्रपटाच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या आठवड्याच्या शूटिंगदरम्यान मी टॉडला सांगितले की आपण सिक्वेलवर काम सुरु केले पाहिजे. अन्वेषण करण्यासाठी बरेच काही आहे. ते असेच म्हटले गेले होते, ते काही खरं नाही.

आता जोकरचा सिक्वेल कधी येईल ते येणारा काळच सांगेल. तसे, वाल्किन आणि टॉड यांच्या वागण्यातून तर असे जाणवत आहे की लवकरच जोकरच्या सिक्वेलबद्दल चाहत्यांना माहिती मिळेल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like