महाराष्ट्रात नोकरकपातीचे संकट ! ‘इंजिनीअर’ होणार असाल तर हे वाचाच

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारतात सर्वच क्षेत्रात बेरोजगारीची समस्या वाढत असताना आता माहिती तंत्रज्ञान (IT) क्षेत्रातही मंदीचे सावट आले असल्याची चिन्हे दिसत आहेत. या क्षेत्रातील नव्या नोकऱ्यांची संधी तर कामी होतच आहे परंतु सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसमोर देखील मनुष्यबळ कपातीचे संकट उभे ठाकले आहे. कारण मोठमोठ्या आयटी कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर नोकरकपात करणार असल्याचे संकेत दिले आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या वाहन आणि प्रॉडक्शन उद्योगानंतर आता आयटी इंडस्ट्रीला देखील मंदीचा फटका बसत आहे.

मूळची अमेरिकेतील मल्टिनॅशनल नामांकित आणि मोठी सॉफ्टवेअर कंपनी असणाऱ्या कॉग्निझंटने भारतामधील शाखांमध्ये कर्मचारी कपात करण्याचे ठरविले असून यासंदर्भात बातमी व्हायरल झाली आहे. या कंपनीची भारतातील अनेक शहरात मोठी कार्यालये आहेत. या कंपनीने मे महिन्यातच मोठ्या प्रमाणावर नोकर कपात केली होती. आता पुन्हा या कंपनीने अनेक सॉफ्टवेअर इंजिनिअर्सना घरी पाठवायला सुरुवात केली आहे. या मंदीची पुणे, मुंबईतल्या ऑफिसमधील काही कर्मचाऱ्यांना देखील झळ पोहचू शकते. बिझनेस टुडेने दिलेल्या वृत्तानुसार कंपनीने किंमत नियंत्रणासाठी (कॉस्ट कटींग) हे पाऊल उचलले असून शेकडो कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोर काही कर्मचाऱ्यांना मिळणारे लाभही कमी केले जाण्याची शक्यता आहे. नोकरीसाठी काही नवीन कर्मचाऱ्यांना (फ्रेशर्स) निवड झाली असूनदेखील नियुक्तीपत्रे देण्यात आली नाहीत.

महाराष्ट्रातील कामगारांवर बेरोजगारीचे संकट :
महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी वाहन उद्योगही अडचणीत असल्यामुळे या क्षेत्रातील नाेकरकपातीच्या बातम्या समोर आल्या होत्या. महिंद्रा अँड महिंद्रा, बॉश या आटोमोबाईल उद्योग क्षेत्रातील मोठ्या कंपन्या महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रात महत्त्वाच्या मानल्या जातात. परंतु सध्या या कंपन्या मंदीच्या लाटेत सापडल्याचे समजते. धोक्यात आलेली ग्रामीण अर्थव्यवस्था तसेच वाढती बेरोजगारी यामुळे आर्थिक मंदीचा फटका वाहन उद्योगासह सर्वच लघुउद्योगांना बसत असल्याचे स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रातील काही कंपन्यांनी तर ‘नो प्रॉडक्शन डे’ जाहीर करत कंपन्या बंद ठेवल्या आहेत. या सर्वाचा फटका अंतिमतः कामगार क्षेत्राला बसत असल्याने त्यांच्या नोकरीत धोक्यात आल्या आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like