खुषखबर ! SBI मध्ये नोकरीची संधी, 149 जागांसाठी भरती

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियात सरकारी नोकरीची संधी निर्माण झाली आहे. SBI ने पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून स्पेशलिस्ट केडर ऑफिसरच्या (SCO) 149 पदासाठी अर्ज मागवले आहेत. इच्छूक उमेदवारांना sbi.co.in वर भेट देऊन अर्ज करावे लागणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 मे 2021 आहे.

पात्रतेच्या अटी, निवड प्रक्रिया आणि वेतन अन्य माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन तपासून घ्यावी. उमेदवारांना अर्ज करताना 750 रुपये (सर्वसाधारणसाठी), एससी-एसटी आणि अपंग उमेदवारांसाठी कोणतीही शुल्क आकारले जाणार नाही. लेखी परीक्षेत यशस्वी उमेदवारांची मुलाखत असेल. यानंतर निवड यादी तयार केली जाईल.

भरण्यात येणारी पदे खालीलप्रमाणेः

1)  डेटा विश्लेषक- 8

2)  फार्मासिस्ट – 67

3)  मुख्य आचार्य अधिकारी – 1

4)  सल्लागार (फसवणूक जोखीम व्यवस्थापन) – 4

5)  उपव्यवस्थापक -10

6)  व्यवस्थापक – 51

7)  कार्यकारी – 1

8)  उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी (आयटी-डिजिटल बँकिंग) -1

9)  वरिष्ठ विशेष कार्यकारी -3

10)  वरिष्ठ कार्यकारी -3

शैक्षणिक पात्रता :  प्रत्येक पदाची पात्रता वेगळी आहे. इच्छूक उमेदवारांनी एसबीआयच्या वेबसाईटवर जाऊन संपूर्ण भरती अधिसूचना पाहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.