7 वा वेतन आयोग : AIIMS नागपूरमध्ये थेट भरती, 2 लाख रूपये पगार आणि भत्ते, जाणून घ्या प्रक्रिया

नागपूर : पोलिसनामा ऑनलाईन – नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) मध्ये फॅकल्टी ग्रुप ए च्या विविध विभागांमध्ये विविध पदांवर थेट भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेत योग्य उमेदवारांची नियुक्ती झाल्यास सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी ई मेलच्या माध्यमातून ७ एप्रिल २०२१ पर्यंत तर पोस्टाच्या साहाय्याने २२ एप्रिल २०२१ पर्यंत अजर करू शकता.

या विभागांमध्ये मिळणार नोकरी
नागपूरच्या एम्सने काढलेल्या परिपत्रकानुसार एकूण १७ पदे भरली जाणार आहेत. त्यामध्ये प्रोफेसरची ५ तर असिस्टंट प्रोफेसरच्या १२ पदांचा समावेश आहे. एंडोक्रिनोलॉजी, जनरल मेडिसीन, जनरल सर्जरी, मेडिकल ऑन्कोलॉजी, नियोनेटोलॉजी, न्यूरोलॉजी, ऑप्थल्मोलॉजी, रेडियोडायग्नोसिस, सर्जिकल ऑन्कोलॉजी, रेडियोडायग्नोसिस, ऑर्थोपेडिक्स आणि ट्रॉमा अँड इमर्जन्सी विभागांमध्ये असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टेंट प्रोफेसर पदावर नोकरी दिली जाईल.

७व्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी
एम्सच्या विविध विभागात होणारी थेट भरती ७ व्या वेतन आयोगानुसार होणार आहे. सातव्या वेतन आयोगाच्या लेवल-१३ ए १ नुसार, १,३८,३००-२,०९,२०० रुपये वेतन आणि असिस्टंट प्रोफेसरसाठी पे स्केल लेवल-१२ के अंतर्गत १,०१,५०० ते १,६७,४०० रुपये आह, सोबत एनपीए (लागू असल्यास) सह सातव्या सीपीसी प्लस सामान्य भत्त्यांचा लाभ मिळेल.

अर्ज शुल्क
ज्या उमेदवारांना एम्सच्या थेट भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावयाचा आहे. त्या उमेदवारांना रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. ‘संचालक एम्स नागपूर’ च्या नावे डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून भरता येतील. अनुसूचित जाती / अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी शुल्क ५०० रुपये आहे.

अर्ज कसा करायचा?
सर्व सूचना वाचल्यानंतर, उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज – संचालक, एम्स नागपूर, प्रशासकीय ब्लॉक, प्लॉट नंबर २, सेक्टर – २०, एमआयएचएएन, नागपूर – ४४११०८ – या पत्त्यावर स्पीड पोस्ट करावा.