DRDO Recruitment 2020 : डीआरडीओ मध्ये 311 पदांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्त संस्था – संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) सायंटीस्ट बी पदाच्या भरतीसाठी जारी केलेल्या जाहिरातीअंतर्गत रिक्त जागांची संख्या वाढवली आहे. उमेदवार आता एकुण 311 पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना संस्थेने भरतीसाठी तयार केलेले पोर्टल rac.gov.in वर जावे लागेल. अर्जाची शेवटची तारीख 10 जुलै 2020 आहे.

डीआरडीओने आपले भरती आणि मुल्यांकन केंद्र म्हणजे आरएसीद्वारे सायंटीस्ट बी पदाकरता 13 मे 2020 रोजी नोटिफिकेशन जारी केले होते, ज्यामध्ये विविध ट्रेड्समध्ये एकुण रिक्त संख्या 167 निर्धारित होती. ज्यामध्ये नंतर ऐरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी म्हणजे एडीए, बेंगळुरू च्या 18 अतिरिक्त 18 जागा 20 मे रोजी नोटीस जारी करून जोडण्यात आल्या, ज्यामुळे एकुण जागा 185 झाल्या आहेत. आता डीआरडीओने सायंटीस्ट बी पदाकरता विविध ट्रेड्समध्ये 126 नव्या जागा सहभागी केल्या आहेत.

डीआरडीओ सायटीस्ट बी पदासाठी अर्ज करणारे उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा उच्च तंत्र शिक्षण संस्थेशी संबंधीत विषयात किंवा ट्रेडमध्ये बीई किंवा बीटेक किंवा मास्टर्स डिग्री उत्तीर्ण झालेले असावेत. आणि ट्रेडमध्ये वॅलिड गेट स्कोर प्राप्त असावा. उमेवारांचे वय अंतिम तारीख म्हणजे 10 जुलै 2020 ला कमाल 28 वर्ष असावे. आरक्षण श्रेणीतील उमेदवारांना सरकारच्या नियमानुसार कमाल वय मर्यादेत सूट देण्याची तरतूद आहे.

अर्जासाठी उमेदवारांनी डीआरडी भरतीच्या पोर्टलवर जावे. जेथे होम पेजवर जाहिरात संख्या 137 शी संबंधीत ऑफिशियल नोटिफिकेशन आणि अ‍ॅपलाय ऑनलाईनची लिंक दिली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवरून सुद्धा अ‍ॅपलीकेशन पेज भरू शकतात.