पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी नोकरी महोत्सव

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

राज्य पोलीस दलातील पोलीसांच्या मुलांसाठी नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १० आणि ११ नोव्हेंबर रोजी पुण्यातील पोलीस मुख्यालयात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते खासगी कंपनीमध्ये ५ हजार नोकऱ्यांचे आदेश देण्यात येणार आहेत. अशी माहिती माजी पोलीस अधिकारी व शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी दिली आहे.
[amazon_link asins=’B00TFGVULI,B07DFYSGS3′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ce453992-b814-11e8-a0b3-27543a5c0a1f’]

पुणे शहरामध्ये शिवाजीनगर व पाषाण येथील पोलीस मुख्यालयामध्ये होणाऱ्या महोत्सवाचे उद्घाटन १० नोव्हेंबर रोजी महासंचालक दत्ता पडसलगीकर, पुणे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते होणार आहे.  ११ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे व पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते निवड झालेल्या पोलीस पुत्रांना नियुक्तीचे आदेश देण्यात येणार आहेत.
[amazon_link asins=’B01DEWVZ2C,B01MSYQWNY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d41d0bcf-b814-11e8-8da7-5d2a5b91625e’]

या महोत्सवामध्ये पुणे आणि आजूबाजूच्या परिसरातील १०० पेक्षा जास्त नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. या कंपन्यांमध्ये शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेनुसार निवड केली जाणार असून जागेवरच नियुक्ती आदेश देण्यात येणार आहेत. पोलीस दलात सध्या कार्यरत असलेल्या व निवृत्त झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मुलांचा या मोहत्सवामध्ये सहभागी होता येणार आहे. निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी असोसिएशनचे अध्यक्ष निवृत्त पोलीस आयुक्त व्ही.एन.जाधव, महसचिव निवृत्त पोलीस उपायुक्त सुखानंद साब्दे, कार्यकारी अध्यक्ष निवृत अतिरीक्त पोलीस महासंचालक खंडेराव शिंदे यांच्या सहकार्याने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा.

पोलीसनामाला ट्विटरवर फाॅलो कर.

पोलीसनामाचे युट्यूब चॅनेलला सब्सक्राईब करा.

पोलीसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जाॅईन व्हा.