GPSC Recruitment 2020 : रिसर्च ऑफिसर आणि प्रोफेसरसह 1203 पदांवर भरती, जाणून घ्या संपूर्ण अपडेट

नवी दिल्ली : गुजरात लोक सेवा आयोगाने विविध पदांसाठी भरती काढली आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 1 नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे आणि 1 डिसेंबरपर्यंत चालेल. ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी ऑफिशियल पोर्टल https://gpsc.gujarat.gov.in/ वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. या अंतर्गत एकुण 1203 पदांवर नियुक्त्या केल्या जातील. अर्ज करतेवेळी उमेदवाराने ही गोष्ट लक्षात ठेवावी की, ऑफिशियल नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. कारण या अर्जात काही गडबड झाली तर अर्ज रिजेक्ट करण्यात येईल.

या तारखा लक्षा ठेवा

अर्जाची सुरूवात होण्याची तारीख – 10 नोव्हेंबर 2020
ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख – 01, 2020

पदांची माहिती व संख्या

रेडियोलॉजिस्ट- 49
पीडियाट्रिशियन- 131
प्रोफेसर- 06
असिस्टंट प्रोफेसर- 38
अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर- 01
चीफ इंडस्ट्रियल कन्सलटंट – 01
इंडस्ट्रियल ऑफिसर- 01
जिओलॉजिस्ट- 07
इंडस्ट्रियल ऑफिसर- 01
रिसर्च ऑफिसर- 35
लायब्रेरी डायरेक्टर- 01
जॉईंट अ‍ॅग्रीकल्चर डायरेक्टर- 01
असिस्टंट आर्कियोलॉजिस्ट डायरेक्टर- 05
असिस्टंट हॉर्टीकल्चर डायरेक्टर- 01

एज्युकेशन क्वालिफिकेशन

रेडियोलॉजिस्ट क्लास – 1 डीएनबी, पीजी डिग्री, डिप्लोमा, प्रोफेसर- मास्टर डिग्री, एडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर- डिग्री, चीफ इंडस्ट्रियल कन्सल्टंट – पीएचडी, इंडस्ट्रियल ऑफिसर- डिग्रीसह अन्य पदांशी संबंधित क्वालिफिकेशन तपासण्यासाठी उमेदवाराने ऑफिशियल पोर्टल तपासावे.