Gj उच्च न्यायालय भरती 2021: गुजरात उच्च न्यायालयातील ‘या’ पदांची भरती, पात्रता आहे किमान दहावी उत्तीर्ण

पोलिसनामा ऑनलाईन – गुजरात उच्च न्यायालयाने विविध पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी केलीय. त्यानुसार कोर्ट अटेंडंट, ऑफिस असिस्टंट, होम अटेंडंट या पदांसाठी नेमणुका घेण्यात येणार आहेत. न्यायालय एकूण 38 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे. तसेच इच्छुक हे https://hc-ojas.gujarat.gov.in/Home.aspx या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.

उच्च न्यायालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार या पदांवर अर्ज करणार्‍या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेतून दहावी उत्तीर्ण केलेली असावी. त्याचबरोबर या पदाच्या उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 35 वर्षे असावे. याशिवाय आरक्षित प्रवर्गाच्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार शिथिलता देण्यात येणार आहे.

गुजरात उच्च न्यायालय भरती 2021: उमेदवारांनी या तारखा लक्षात ठेवाव्यात.
ऑनलाईन अर्ज प्रारंभ तारीख – 1 मार्च 2021
ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख – 31 मार्च 2021
उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज कसा करावा.

गुजरात उच्च न्यायालयाने घेतलेल्या विविध पदांवर रिक्त जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी प्रथम गुजरात उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://gujarathighcourt.nic.in/currentopenings वर भेट द्यावी. त्यानंतर, भरती – करियर अ‍ॅडव्हर्टायझिंग मेनू यावर जाऊन क्लिक करावे. यानंतर, पीडीएफ स्वरूपात अधिकृत दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी. आणि आपली पात्रता सत्यापित करावी. त्यानंतर आवश्यक तपशील योग्यरित्या भरावा. यानंतर आवश्यक असणारी सर्व संबंधित कागदपत्रे विहित नमुन्यात आणि आकारात अपलोड करावीत. अर्ज/ फॉर्म अपलोड केल्यानंतर त्याचे प्रिंटआउट काढून घ्यावे आणि भविष्यासाठी जपून ठेवावे.

यासह अलीकडे बँक ऑफ इंडियाने ऑफिस असिस्टंट, अटेंडंट, वॉचमन आणि फॅकल्टी या पदांच्या जागांची भरती काढली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 22 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. अशा परिस्थितीत, ऑनलाइन अर्ज करू शकणारे उमेदवारांनी संबंधित अधिकृत पोर्टलला भेट द्यावी. तसेच इच्छुकांनी दिलेल्या सूचनांनुसार अर्ज करावेत.

(टीप : नोकरीविषयक असलेल्या बातम्या तसेच माहिती आपणाला माहित व्हावी, म्हणून देण्यात येत आहेत. कृपया आपण याची योग्य ती खातरजमा करून पुढील निर्णय घ्यावा, हि विनंती)