बँकेत नोकरीची इच्छा असणार्‍यांसाठी सुवर्णसंधी ! 5 बँकांत 1558 पदांसाठी भरती, फक्त अर्ज करा अन् मिळवा Job

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे अनेंकाच्या नोकऱ्यांवर गंडांतर आले आहे. अशातच इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शने (आयबीपीएस) युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया तर अन्य बँकात लिपिक पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यावर्षी आयबीपीएस च्या माध्यमातून एकूण १५५८ पदांसाठी कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस (सीआरपी) साठी उमेदवारांची निवड केली जाईल. त्यासाठी २ सप्टेंबर २०२० पासून ऑनलाइन नोंदणी सुरु केली आहे.

उमेदवारांना लिपिक भरती २०२० साठी ibpsonline.ibps.in या ऍप्लिकेशन पोर्टल वर जाऊन नोंदणी करता येणार आहे. नोंदणीची अखेरची तारीख संस्थेमार्फत २३ सप्टेंबर २०२० निश्चित केली आहे. तसेच उमेदवारांना २३ सप्टेंबर पर्यंत लिपिक पदासाठी विहित अर्ज शुल्काचे ऑनलाइन पेमेंट करणे, त्यांच्या अर्जात बदल करणे आणि ऑनलाइन सादर केलेल्या अर्जाची प्रत मिळवता येईल. उमेदवार खाली दिलेल्या थेट संकेतस्थळामार्फत आयबीपीएस लिपिक अधिसूचना २०२० डाउनलोड करु शकतात आणि आबीपीएस लिपिक २०२० ऑनलाइन अर्ज पृष्ठावर प्रवेश करु शकतात.

कोणाला अर्ज करता येईल?

यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा संस्थेकडून कोणत्याही विषयात बॅचलर पदवी पास केली पाहिजे. पोर्टलवर नोंदणी करताना मार्कशीट व पदवी प्रमाणपत्र उलपब्ध असण्याची गरज आहे. कारण त्यांचा पास टक्केवारी ऑनलाइन फॉर्म भरताना प्रवेश करण्यास सक्षम व्हावा. शैक्षणिक पात्रतेसोबत उमेदवाराचे वय १ सप्टेंबर २०२० रोजी किमान २० वर्षे आणि जास्तीत जास्त २८ वर्षे हवे.

भरती प्रक्रिया जाणून घ्या

प्रथम नोंदणीकरता उमेदवारांनी पोर्टलला भेट दिल्यावर लिंकवर क्लिक करुन नोंदणी करावी. नोंदणीसाठी नाव, मोबाइल क्रमांक, आणि ई-मेल आयडीचा तपशील नोंद करावा लागणार आहे. त्यानंतर उमेदवारांना नोंदणी क्रमांक आणि संकेतशब्द संस्थद्वारे ई-मेल आणि मोबाइल नंबर पाठवला जाईल. त्यामार्फत उमेदवार लॉग इनद्वारे त्यांचे आयबीपीएस लिपिक २०२० ऑनलाइन अर्ज सबमिट करु शकतील.