IBPS PO 2020 : आयबीपीएसनं प्रोबेशनरी ऑफिसरच्या पदांची संख्या वाढवली, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनने नुकतीच विविध बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदांसाठी भरती काढली आहे. आता आयबीपीएसने एकूण पदांची संख्या १४१७ केली आहे, तर अगोदर ११६७ पदांसाठी भरती काढण्यात आली होती. परंतु आता या पदांची संख्या वाढवण्यात आली आहे. या संदर्भात आयबीपीएसने अधिकृत साइट ibps.in वर एक अधिसूचना जारी केली आहे. अर्ज प्रक्रिया ५ ऑगस्ट २०२० पासून सुरू झाली आहे आणि २६ ऑगस्ट २०२० रोजी समाप्त होईल. परीक्षापूर्व प्रशिक्षणासाठी कॉल लेटर सप्टेंबर २०२० पर्यंत उपलब्ध होईल.

पीओ पदांवर अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १ ऑगस्ट २०२० रोजी २० ते ३० वर्षे वयोगटातील असावे. याचा अर्थ उमेदवाराचा जन्म २ ऑगस्ट १९९० किंवा त्यानंतर मात्र १ ऑगस्ट २००० पर्यंत झाला असावा. आयबीपीएस परीक्षा देशातील बर्‍याच केंद्रांमध्ये ऑनलाईन घेण्यात येईल. ऑनलाईन प्रारंभिक परीक्षा व ऑनलाइन मुख्य परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांची तात्पुरती यादी अधिकृत साईटवर उपलब्ध आहे. उमेदवार येथे उपलब्ध असलेल्या अधिसूचना वाचून अपडेट मिळवू शकतात.

शैक्षणिक पात्रता
पीओ पदांवर अर्ज करणारे उमेदवार कोणत्याही शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवीधर असावेत.

जागांचा तपशील
बँक ऑफ बडोदा- ० पदे
बँक ऑफ इंडिया- ७३४ पदे
बँक ऑफ महाराष्ट्र- २५० पदे
सेंट्रल बँक- ० पदे
सेंट्रल बँक ऑफ इंडिया- ० पदे
इंडियन बँक- ० पदे
इंडियन ओव्हरसीज बँक- ० पदे
पंजाब आणि सिंध बँक- ८३ पदे
यूको बँक- ३५० पदे

अर्ज फी
या परीक्षेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना ८५० रुपये द्यावे लागतील. त्याचबरोबर एससी, एसटी, पीडब्ल्यूडी प्रवर्गाशी संबंधित इतर प्रवर्गातील उमेदवारांना १७५ रुपये द्यावे लागतील. उमेदवारांना फी ऑनलाईन जमा करायची आहे. याशिवाय अधिक माहितीसाठी उमेदवार आयबीपीएसच्या अधिकृत संकेतस्थळार भेट देऊ शकतात.