भारतात सन 2021 मध्ये कोण-कोणत्या नोकर्‍यांना असेल जास्त मागणी, ‘इथं’ पाहा यादी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  2021 ची सुरुवात झाली आहे. मागील वर्ष संपूर्ण जगासाठी अनेक प्रकारे आव्हानात्मक होते. यात कोरोना विषाणूच्या संसर्गाची सर्वात मोठी भूमिका होती. या आजाराने केवळ लोकांचा जीव घेतला नाही तर आर्थिक, रोजगारासह अनेक स्तरावर लोकांसाठी समस्या निर्माण केल्या. दरम्यान, आता नवीन वर्षात लोकांना आशा आहे की, हे मागील वर्षापेक्षा चांगले असेल आणि यावर्षी भारतात रोजगाराच्या(Job) संधी वाढतील. नोकरी गमावलेल्या बर्‍याच लोकांना पुन्हा एकदा संधी मिळेल. अशा परिस्थितीत जाणून घेऊया यावर्षी भारतात कोणत्या नोकऱ्यांना जास्त मागणी असेल….

फुल स्टॅक डेव्हलपर्स 

हे वेब डेव्हलपिंग, त्याच्या मेंटेनन्सशी संबंधित काम आहे. लॉकडाउननंतर सर्व क्षेत्रात ऑनलाइन कामांना प्राधान्य दिले जात आहे आणि म्हणूनच या नोकरीची मागणी बाजारपेठेत वाढली आहे. आपणास कोडिंगमध्ये आवड असल्यास आणि जावा, सीएसएस, पायथन इत्यादींचे ज्ञान असल्यास या क्षेत्रात प्रयत्न केला जाऊ शकतो.

आर्टिफिशियर इंटेलिजेंस (AI)

भारतात या क्षेत्रात काम करणारे लोक कमी आहेत. एका आकडेवारीनुसार एआय पदासाठी जवळपास 2500 पदे रिक्त आहेत. ही संख्या येत्या काळात आणखी वाढेल अशी अपेक्षा आहे. यासाठी एआय अल्गोरिदम, प्रोग्रामिंग इत्यादी माहिती आवश्यक आहे.

डेटा सायंटिस्ट

अहवालानुसार अ‍ॅनॅलेटिक्स रेव्हेन्यूमध्ये 16 टक्के मागणी अ‍ॅडॅवान्स अ‍ॅनॅलेटिक्स, डेटा विज्ञान, प्रिडक्टीव्ह मॉडेलिंग म्हणजेच आकड्यांनूसार अंदाज इत्यादी क्षेत्रात आहे. 2018 च्या तुलनेत हे 11 टक्के जास्त आहे. यावरून असे दिसून येते की आता भारतातही डेटा सायंटिस्टची मागणी वेगाने वाढत आहे. यासाठी आकडेवारी, गणितासोबत एसक्यूएल, पायथन आणि आर सारख्या तांत्रिक भाषेचे ज्ञान आणि पॉवर बीआय, Tableau टूल्समपगचीही माहीती असणे आवश्यक आहे.

डिजिटल मार्केटिंग 

जर आपण क्रिएटीव्ह आहात आणि ब्रँड बिल्डिंगसह मार्केटिंगमध्ये आवड असल्यास, हे फील्ड आपल्यासाठी आहे. व्यवसायासाठी ऑनलाइन कामाच्या मागणीसह अलीकडच्या काळात डिजिटल मार्केटींगची मागणीही वाढली आहे. यासाठी तुम्ही डिजिटल मार्केटींगचा कोर्स करू शकता. तसेच एमबीए करणे देखील या क्षेत्रात फायदेशीर ठरेल. नवीन वर्षात भारतातील आयटी क्षेत्रातही वेग वाढण्याची अपेक्षा आहे. डिजिटल क्षेत्रात सतत वाढत असलेल्या कामांमुळे असे दिसून आले आहे की येत्या वर्षभरात तरुणांसाठी बर्‍याच चांगल्या संधी उपलब्ध आहेत.