Indian Coast Guard Recruitment 2020 : इंडियन कोस्ट गार्डमध्ये नाविक पदासाठी भरती, 7 डिसेंबरपर्यंत करा अर्ज

Indian Coast Guard Recruitment 2020 : इंडियन कोस्ट गार्डने नाविक पदांसाठी व्हॅकन्सी काढली आहे. या अंतर्गत एकुण 50 पदांवर भरती केली जाईल. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाईटवर अर्ज करू शकतात. ही अर्ज प्रक्रिया 7 डिसेंबर 2020 पर्यंत चालणार आहे, यासाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी ऑफिशियिल वेबसाइटवर जाऊन अप्लाय करावे.

उमेदवारांनी लक्षात ठेवावे की, ऑनलाइन फॉर्म 30 नोव्हेंबर 2020 पासून 7 डिसेंबर 2020 पर्यंत joinindiancoastguard.gov.in वर उपलब्ध असेल. या पोस्टसाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांना कोणत्याही केंद्रीय, राज्य सरकारद्वारे मान्यता प्राप्त शिक्षण बोर्डाकडून एकुण 50% गुणांसह 10 पास होणे आवश्यक आहे. याशिवाय उमेदवारांची वयोमर्यादा या पोस्टसाठी 18 ते 22 असावी. उमेदवारांनी अर्ज प्रक्रिया, पात्रता आणि अनुभव इत्यादी माहितीसाठी ऑफिशियल नोटिफिकेशन चेक करावे.

महत्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज जमा करण्यास सुरूवात : 30 नोव्हेंबर 2020
ऑनलाइन अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख : 7 डिसेंबर 2020

असा करा ऑनलाइन अर्ज

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन मोडच्या माध्यमातून joinindiancoastguard.gov.in वर 30 नोव्हेंबरपासून 7 डिसेंबर 2020 सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करायचा आहे. उमेदवाराला आपले हस्ताक्षर अपलोड करावे लागेल. फोटोग्राफवर सहीचा आकार अनुक्रमे 10 केबी ते 40 केबी आणि 10 केबी ते 30 केबीच्या दरम्यान असावा. अर्ज भरल्यानंतर तो पूर्ण तपासून घ्या. अर्जात काही चूक असल्यास तो नाकारण्यात येईल.