Konkan Railway Recruitment 2020 : रेल्वेत ‘या’ पदांसाठी निघाली व्हॅकन्सी, 29 नोव्हेंबरपर्यंत करा अर्ज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने टेक्नीशियनच्या पदांसाठी व्हॅकन्सी काढली आहे. याअंतर्गत एकुण 58 पदांवर नियुक्ती केली जाईल. या पदांवर अर्ज प्रक्रिया नुकतीच सुरू झाली आहे आणि 29 नोव्हेंबर 2020 पर्यंत ती चालेल. ज्या उमेदवारांना या पोस्टसाठी अर्ज करायचा आहे ते http://konkanrailway.com/ वर अर्ज करू शकतात. उमेदवारांनी हे लक्षात ठेवावे की, अर्ज करण्यापूर्वी ऑफिशियल नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि त्यामधील अटींनुसार अर्ज करा, कारण अर्जात कोणतीही गडबड झाल्यास अर्ज रिजेक्ट केला जाईल.

ही लिंक क्लिक करून वाचा संपूर्ण ऑफिशियल नोटिफिकेशन
http://konkanrailway.com/uploads/vacancy/1603866686Notification_2_Technician_2020.pdf

या पदासाठी उमेदवाराचे वय 18 ते 33 वर्षांच्या आत असावे. वयाची गणना 1 जानेवारी 2021 च्या हिशेबाने केली जाईल. याशिवाय एज्युकेशन क्वालिफिकेशनसह अन्य डिटेल्स चेक करण्यासाठी नोटिफिकेशन वाचावे. ही भरती प्रक्रिया सीबीटी आणि डीव्ही राऊंडच्या आधारावर होईल. या राऊंडमध्ये यशस्त्री होणार्‍या उमेदवारांना मेडिकलसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल.

उमेदवारांनी हे लक्षात ठेवावे की, सीबीटी आणि डीव्हीसाठी तारीख, वेळ आणि स्थळ किंवा अन्य कोणतीही माहिती केआरसीएलद्वारे ठरवली जाईल आणि योग्य उमेदवाराला कळवले जाईल. यासाठी उमेदवारांना सल्ला दिला जात आहे की, त्यांनी या भरतीसाठी अर्ज केल्यानंतर ऑफिशियल पोर्टलवर भेट देत राहावे.

एवढे असेल शुल्क
सामान्य वर्गातील उमेदवारांसाठी 500 रुपये तर एससी, एसटी, माजी सैनिक, महिला, अल्पसंख्यांक किंवा आर्थिकदृष्ट्या मागास वर्गासाठी 250 रुपये शुल्क भरावे लागेल. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.

You might also like