आता नोकरी गेली तर येणार नाही EMI चे टेन्शन, घ्या ’जॉब लॉस इन्श्युरंस’, जाणून घ्या फायदे

नवी दिल्ली : प्रायव्हेट नोकरी करणार्‍यांना नेहमी नोकरी जाण्याची भिती असते. अशावेळी मध्यमवर्गीय लोकांना एखादा असा पर्याय हवा, ज्याच्या मदतीने ते अचानक आलेल्या आर्थिक अडचणींपासून स्वताला सुरक्षित करू शकतील. बहुतांश मध्यमवर्गीय कुटुंबियांवर कर्जाचे ओझे असते, ज्यासाठी ते नियमित हप्ते भरत असतात. अशावेळी इन्श्युरंस पॉलिसी खुप उपयोगी ठरू शकते. लॉस ऑफ जॉब/इन्कम इन्श्युरंस स्वताला अशा अडचणींपासून सुरक्षित बनवण्याचे काम करते. यास बाजारात जॉब लॉस इन्श्युरंस कव्हर नावाने ओळखले जाते. अनेक जनरल इन्श्युरंस कंपन्या अशाप्रकारची पॉलिसी ऑफर करतात.

जॉब लॉस इन्श्युरंस म्हणजे काय, याचे फायदा कोणते
या इन्श्युरंसमध्ये नोकरदार आणि स्वताचा व्यापर करणार्‍या लोकांसाठी विविध प्लॅन आहेत आणि दोन्ही प्लॅन अंतर्गत मिळणारे लाभसुद्धा वेगवेगळे आहेत. नोकरीतून काढले जाणे किंवा कपातीमुळे झालेल्या उत्पन्नाच्या नुकसानीच्या स्थितीत इन्श्युरंस कंपनी तीन महिन्यापर्यंत ग्राहकाच्या कर्जाचा हप्ता चुकवते. (हप्त्याची रक्कम ग्राहकांच्या सध्याच्या ईएमआयच्या आधारा असेल).

तर, अंशता किंवा स्थायी अपंगत्वाच्या स्थितीत इन्श्युरंस कव्हरेज प्राप्त व्यक्तीला साप्ताहिक वेतन लाभ मिळतो, जो रुपये 1 लाख प्रति आठवड्यापर्यंत असू शकतो. (ग्राहकाच्या मुळ वेतनावर आधारित) आणि हा कमाल 100 आठवड्यापर्यंत दिला जाईल. काही प्लॅन असे सुद्धा आहेत, जे गंभीर आजार, अंशता स्थायी अपंगत्व किंवा अंशता अस्थायी अपंतगत्वासाठी कव्हरेज देते. हा प्लॅन खरेदी केल्यानंतर ग्राहक आपल्या पॉलिसीसाठी चुकवलेल्या प्रीमियमच्या रक्कमेत इन्कम टॅक्स अ‍ॅक्टच्या सेक्शन 80 (डी) च्या अंतर्गत टॅक्स सूटचा सुद्धा लाभ घेऊ शकतात.

कुठून घेऊ शकतात कव्हर
भारताच्या ऑनलाइन इन्श्युरंस मार्केटप्लेसने एक नवीन सेक्शन लाँच केला आहे, जेथून लोक जॉब/इन्कम लॉस इन्श्युरंस प्रोडक्ट्स खरेदी करू शकतात. या नव्या सेक्शनमध्ये जाऊन लोक भारतातील विमा कंपन्या जसे की, एसबीआय जनरल, श्रीराम जनरल, युनिव्हर्सल सॉम्पो आणि आदित्य बिर्ला इन्श्युरंस द्वारे सादर करण्यात येणार्‍या प्रॉडक्टची पूर्ण माहिती घेऊ शकतात.