NITI Aayog Recruitment 2021 : नीति आयोगामध्ये सरकारी नोकऱ्या, 60 हजार पगार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  नीति आयोगामध्ये सरकारी नोकरीच्या संधीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी कामाची बातमी आहे. अटल इनोव्हेशन मिशन आणि इतर कार्यक्रमांसाठी 15 तरुण व्यावसायिकांच्या भरतीसाठी आयोगाने जाहिरात जारी केली आहे. या पदांची भरती करार तत्त्वावर करावी लागणार आहे. आयोगाच्या यंग प्रोफेशनल रिक्रूटमेंट जाहिरातीनुसार, इच्छुक व पात्र उमेदवार आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या ऑनलाईन अर्जाद्वारे, niti.gov.i वर अर्ज करू शकतात. नीति आयोग यंग प्रोफेशनल रिक्रूटमेंट 2021 अंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 जानेवारी (अटल इनोव्हेशन मिशनसाठी) आणि 24 जानेवारी 2021 आहे.

नीति आयोगाद्वारे जाहीर केलेल्या अटल इनोव्हेशन मिशनसाठी 5 तरुण व्यावसायिकांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 जानेवारी आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थांकडून बीई / बीटेक किंवा एमएससी किंवा एमटेक किंवा पीएचजी किंवा गणित / अर्थशास्त्र / व्यवस्थापन / संप्रेषण विकास किंवा व्यवस्थापन पदविका पदवी घेतलेले उमेदवारच या पदांसाठी अर्ज करू शकतात. सीए किंवा सीएमए असलेले किंवा 4 वर्षांच्या व्यावसायिक पदवी नंतरचे उमेदवार देखील अर्ज करू शकतात.

यंग प्रोफेशनल भरती

त्याचबरोबर नीति आयोगाच्या दुसर्‍या जाहिरात अंतर्गत यंग प्रोफेशनल्सच्या 10 पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी 24 जानेवारीपर्यंत अर्ज करता येतील. या पदांसाठी पदव्युत्तर पदवी किंवा बीई / बीटेक किंवा दोन वर्षांचे मॅनेजमेंट डिप्लोमा किंवा एलएलबी किंवा सीए किंवा सीएमए असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.