अभिमानास्पद ! बांगलादेशातील ‘या’ बडया कंपनीतून इचलकरंजीतील 31 विद्यार्थ्यांना नोकरीची ‘ऑफर’

पोलीसनामा ऑनलाइन टीम : एका बाजूला बेरोजगारांचा आकडा वाढत असताना कुशल तंत्रज्ञ आणि वेगळं करु पाहणाऱ्यांचा सर्वच मोठ्या कंपन्यांना तुटवडा लावत असतो. त्यावर उपाय म्हणून या कंपन्या थेट महाविद्यालयात जाऊन अशा होनहार विद्यार्थ्यांना हेरुन भली मोठी ऑफर देतात. शहराबरोबरच आता ग्रामीण भागातील टेक्निकल महाविद्यालयातकडेही या कंपन्याची नजर आता वळू लागली आहे. त्यातूनच बांगला देशातील नॉईज जीन्स या आंतरराष्ट्रीय कंपनीने इंचलकरजीमधील डीके टीई च्या टेक्सस्टाईल व इंजिनिअरिंगची पदवी शिक्षण पूर्ण केलेल्या ३१ विद्यार्थ्यांना थेट ऑफर दिली आहे. वार्षिक साडेआठ लाख रुपयांच्या वेतनावर त्यांची निवड करण्यात आली आहे.

नॉईज जीन्स या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या ढाका येथील अधिकाऱ्यांनी डीकेटीईला भेट दिली व विद्यार्थ्यांचे विविध फेऱ्यांमधून सिलेक्शन केले. सुरुवातीस अ‍ॅप्टीटयूड टेस्टव्दारे विद्यार्थ्यांची बुध्दीमत्ता तपासण्यात आली. त्यानंतर प्रीसिलेक्शन व फायनल सिलेक्शन च्या दोन फेऱ्यांमधून विद्यार्थ्यांची निवड केली.
बांगला देशातील नॉईज जीन्स ही अत्याधुनिक मशिनरीनी युक्त कंपनी विशेषत: डेनिम फॅर्बिक्स, जीन्स, जॅकेटस, शर्टस उत्पादित करते. विव्हींग, गारमेंटींग, डाईंगच्या अत्याधुनिक मशीनरीवर क्वालिटी प्रोडक्टस बनविणारी ही जगातील नामांकित कंपनी आहे. अशा या आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत कंपनीमध्ये डीकेटीईच्या २८ टेक्स्टाईलच्या व ३ इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

लठ्ठपणामुळे होऊ शकतात ‘हे’ १० गंभीर आजार

डिप्रेशनवर उपचार करा घरच्या घरी ; ‘ह्या’ सात सोप्या पद्धती

‘बल्जिंग डिस्क’ आजार माहीत आहे? जाणून घ्या कारणे

गरोदरपणा नंतरचा लठ्ठपणा नको ? मग ‘हे’ पाणी प्या