सरकारी बँकांमध्ये नोकरीची संधी ! PO, मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी भरती सुरु

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. सध्या मंदीच्या काळात सरकारी बँकांमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. इंस्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPC) द्वारे प्रोबेशनरी ऑफिसर्स (PO) आणि मॅनेजमेंट ट्रेनी (MT) च्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यासाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया IBPS.in वर आजपासून (दि.5) सुरु झाली आहे.

IBPS च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात पूर्व परीक्षा आणि दुसऱ्या टप्प्यात लेखी परीक्षा होणार आहे. दोन्ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. दोन्ही परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे. मुलाखतीत उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींची अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.

भरती प्रकियेबाबतची महत्त्वाची माहिती
ऑनलाइन नोंदणी – 5 ते 26 ऑगस्ट 2020
प्रीलिम्सट्रेनिंगसाठी कॉललेटर डाऊनलोड – सप्टेंबर 2020
पूर्वपरीक्षेच्या ट्रेनिंगसाठी तारीख – 21 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर 2020
ऑनलाइन पूर्व परीक्षेसाठी कॉल लेटर डाऊनलोड – ऑक्टोबर 2020
ऑनलाइन पूर्व परीक्षा – 3, 10 आणि 11 ऑक्टोबर 2020
ऑनलाइन मुख्य परीक्षा कॉल लेटर डाऊनलोड – नोव्हेंबर 2020
ऑनलाइन मुख्य परीक्षा – 28 नोव्हेंबर 2020
ऑनलाइन मुख्य परीक्षेच्या निकालाची घोषणा – डिसेंबर 2020
मुलाखतीसाठी कॉल लेटर डाऊनलोड – जानेवारी 2021
मुलाखत – जानेवारी/फेब्रुवारी 2021
प्रोव्हिजनल अलॉटमेंट – एप्रिल 2021

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like