लोकसभा सचिवालयात 12 वी ते MBA उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी, 90 हजार पगार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा सचिवालयामध्ये विविध जागांवर भरती निघाली आहे. या भरतीमध्ये हेड कॉन्सल्टंट, सोशल मीडिया मार्केटिंग (सीनियर कन्सल्टंट), सोशल मीडिया (ज्युनियर कन्सल्टंट), ग्राफिक डिझायनर, सीनियर कंटेंट रायटर (हिंदी), ज्युनिअर कंटेंट रायटर (हिंदी) आणि सोशल मीडिया मार्केटिंग (ज्युनिअर असोसिएट) इत्यादी 9 पदांवर भरती करण्यात येणार आहे.

पदांची संख्या

हेड कॉन्सल्टंट – 01
सोशल मीडिया मार्केटिंग (सीनियर कन्सल्टंट) -01
सोशल मीडिया (ज्युनियर कन्सल्टंट) – 01
ग्राफिक डिझायनर – 01
सीनियर कंटेंट रायटर (हिंदी) – 01
ज्युनिअर कंटेंट रायटर (हिंदी) – 01
सोशल मीडिया मार्केटिंग (ज्युनिअर असोसिएट) – 03

शैक्षणीक पात्रता

लोकसभा सचिवालयात या भरतीसाठी शिक्षणाची अट वेगवेगळी आहे. यामध्ये 12 वी पास ते ग्रॅज्युएट आणि एमबीएपर्यंत शिक्षण आवश्यक आहे.

वयाची अट

लोकसभा सचिवालयात कन्सल्टंट भरतीसाठी वयाची अट 22 ते 58 वर्षे ठेवण्यात आली आहे.

वेतन

सोशल मीडिया मार्केटिंग पदासाठी 35 हजार रुपये प्रतिमाह. हेड कन्सल्टंट पदासाठी 90 हजार रुपये प्रतिमहिना पगार दिला जाणार आहे.

अर्ज कसा करायचा

या पदांसाठी ऑफलाईनद्वारे अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख नोटिफिकेशन जारी झाल्यानंतर 21 दिवसांनी असणार आहे. 18 जानेवारी रोजी नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. त्यानुसार 8 फेब्रुवारी ही अंतीम तारीख आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईट loksabha.nic.in वर जाऊन अर्ज डाऊनलोड करु शकतात