Supreme Court Of India Recruitment 2020 : सुप्रीम कोर्टात नोकरीची सुवर्णसंधी, पगार 35 ते 67,700 रूपयांपर्यंत, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्वोच्च न्यायालयात नोकरीची संधी चालून आली आहे. जर तुम्ही बीई किंवा बीटेक केले असेल कींवा संगणक सायन्समध्ये पदवी घेतली असेल तर तुमच्यासाठी ही संधी दार ठोठावत आहे. केंद्र सरकारच्या या नोकरीसाठी नोटीफिकेशन जारी करण्यात आल आहे. रिक्त पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे. दि. 6 नोव्हेंबर पर्यत अर्ज भरता येणार आहे.

कोणती पदे रिक्त आहेत.
शाखा अधिकारी ( नेटवर्क प्रशासक) 1 पद ( मुलभूत वेतन: दरमहा : 67 हजार 700 रु)
शाखा अधिकारी ( वेब सव्हर्र प्रशासक)- 1 पद- ( मुलभूत वेतन: दरमहा : 67 हजार 700 रु)
शाखा अधिकारी ( डेटाबेस प्रशासक) 2 पद- ( मुलभूत वेतन: दरमहा : 67 हजार 700 रु)
कनिष्ट कोर्टाचे सहायक ( हॅरियर मेंटेन्स) 3 पद- ( मुलभूत वेतन: दरमहा : 35 हजार400 रु)
प्रशासकीय कारणांमुळे रिक्त जागांची संख्या कमी – जास्त होऊ शकते.

अर्ज कसा करावा
रिक्तपदासाठी आपल्याला सर्वोच्च न्यायालयात ऑफलाईन अर्ज करावा लागेल. अधिसूचनेसह अर्ज प्रसिध्द करण्यात आला आहे. आपण खालील लिंकवरून डाऊनलोड करू शकता. डाऊनलोड केल्यानंतर अर्जाचा प्रिंटआऊट घ्या. त्यानंतर अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या सूचनांनुसार ते भरा आणि दिलेल्या पत्यावर ते पाठवा आपला पुर्ण भरलेला अर्ज 6 नोव्हेंबर 2020 पर्यंत या पत्त्यावर पोहचला पाहिजे. या तारखेनंतर अर्ज स्विकारला जाणार नाही.

निवड कशी होईल
रिक्त पदावरील पात्र उमेदवारांची निवड लेखी परीक्षा (वस्तूनिष्ठ चाचणी) योग्यता चाचणी (उद्देश प्रकार) आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल.
सर्वोच्च न्यायलयाची रिक्त जागा 2020 – अधिसूचना व अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. https://main.sci.gov.in/pdf/recruitment/15102020_153235.pdf?_ga=2.211254173.943236444.1602902783-763477693.1584512576